ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मालखेड तलावावर पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी रंगीत तालीम:मान्सूनपूर्व पूर आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या पूर परिस्थितीचा यशस्वी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिष येरेकर यांच्या आदेशाने ‘मॉकड्रिल’चे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथक, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या थरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड तलाव येथे जिल्हास्तरीय पूर आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम (मॉकड्रिल) पार पडली. या रंगीत तालीमीदरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे, त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवणे आणि पूर परिस्थितीमुळे घरांची पडझड किंवा इतर आपत्ती ओढवल्यास शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून जीवितहानी कशी टाळायची, याचे थेट सादरीकरण करण्यात आले. विशेषतः ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ती स्थानिक पातळीवर कशी हाताळावी, याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण एनडीआरएफ नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथकातील तज्ज्ञांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे दिले. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय असाव्यात, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, चांदूर रेल्वेचे नायब तहसीलदार अनिल चौरे, पोलिस निरीक्षक मिश्रा, पोलिस निरीक्षक यादव, एनडीआरएफ नागपूरचे डॉ. झा, मुंबई मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ अनुराग कचोरी, महसूल अधिकारी प्रमोद शिरसाठ, तलाठी दीपक चव्हाण, आरोग्य यंत्रणेचे डॉ. अविनाश पवार, प्रीती पवार, सौरव पाठक, मनोज माकोडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सचिन धरमकर, विशाल लिमकर, आकाश निमकर, कौस्तुभ वैद्य, सुमित बांबल, प्रतिक कडू, नारायण दवंगे, अशोक निंबरते तसेच ‘आपला मित्र’ संस्थेचे तुषार गोंडाणे व अमोल गोंडाणे यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून शौर्यपूर्ण बचावकार्याची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र रामेकर यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर