ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

छगन भुजबळांनाही AAIB अहवालावर शंका:म्हणाले – अजित पवारांचे विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान दिसले असते

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अजित पवारांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान दिसले असते, असे त्यांनी म्हटले आहे. या विधानाद्वारे एकप्रकारे त्यांनी या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. ते मुंबईहून बारामतीकडे येत असताना हा अपघात झाला. तेव्हापासून या अपघाताविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील अनेक नेत्यांनी या अपघात नव्हे तर घातपात असल्याचा आरोप केला आहे. विशेषतः शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी वेगवेगळे पुरावे व माहिती समोर आणून तपास यंत्रणांच्या नाकीनऊ आणलेत. त्यातच एएआयबीने आपल्या अहवालात अजित पवारांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी एका झाडाला धडकल्याचा दावा केल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. छगन भुजबळ यांनीही नेमक्या याच मुद्यावर बोट ठेवले आहे. अजित पवारांचे विमान हवेतच कलंडून कोसळले छगन भुजबळ आज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अजित पवार यांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले नाही. विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान झाले असते. पण तसे कोणतेही नुकसान दिसले नाही. विमान झाडावर पडल्याचे कुणी पाहिलेही नाही. विमान हवेतच कलंडले होते. त्यानंतर ते कोसळले. हे सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसून येत आहे. आम्ही घटनास्थळी गेलो तेव्हा तिथे आम्हाला कुणीही विमान झाडाला धडकल्याचे सांगितले नाही. विमानतळावर अजित पवारांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते. त्यापैकी कुणीही विमान झाडावर आदळल्याचा दावा करत नाही. त्यामुळे हे विमान झाडावर आदळल्याचे वाचून मलाही आश्चर्य वाटले. विमान झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान झाले असते. पण घटनास्थळी एकाही झाडाचे नुकसान झाल्याचे दिसले नाही, असे भुजबळ एएआयबीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले. पायलटच्या सीटवर झोपणे हा मुजोरपणा दुसरीकडे, अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह विमान उडत असताना पायलटच्या सीटवर बसून झोपल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळ यांना या व्हिडिओविषयी छेडले असता त्यांनी तो व्हिडिओ अजित पवारांच्या विमानातील नसल्याचे स्पष्ट केले. जय पवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ अजित पवारांच्या विमानातील नाही. त्यात मालक असता तर तो ही ठार झाला असता. पण ते चुकीचे आहे. फक्त पायलटच त्या सीटवर बसू शकतो. मालक झोपला असेल तर तो निष्काळजीपणा व मुजोरपणा आहे, असे भुजबळ म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर