ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

घरकुलच्या निधीसाठी पं.स.त ठिय्या आंदोलन:आश्वासनांनंतरही हप्ता नाही; लाभार्थ्यांचा संताप‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या रखडलेल्या हप्त्यांचा प्रश्न अखेर रस्त्यावर आला आहे. संतप्त लाभार्थ्यांनी शिवसेना उबाठा गटाच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. बुधवार, दि. १० जून रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान लाभार्थी आणि शिवसैनिकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच झुणका-भाकर खाऊन प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला. यापूर्वी दि. ३ जून रोजी (उबाठा) पक्षाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तातडीने जमा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या आहेत प्रमुख मागण्या तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी शासनाच्या सूचनेनुसार घरकुल बांधकामाला सुरुवात केली. काहींनी स्वतःच्या खिशातून कर्ज काढून किंवा उसनवारी करून काम पुढे नेले. मात्र मंजूर झालेले हप्ते वेळेवर न मिळाल्याने अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत आहेत. काही लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी घर पूर्ण करण्याची अपेक्षा होती; परंतु निधीअभावी बांधकामे ठप्प झाली आहेत. आंदोलनादरम्यान लाभार्थ्यांनी शासन, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रखडलेले हप्ते वितरित करण्याची मागणी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर