ब्रेकिंग न्यूज
FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…
SP News Maregaon

विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर:395 ‎शाळा आजही “कॅमेऱ्यांविना’; जबाबदार कोण?‎ बदलापूरचा धडा विसरला का?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये‎सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला‎असला, तरी प्रत्यक्षात ३९५ शाळांमधील हा‎महत्त्वाकांक्षी प्रकल्प निधीअभावी रखडला‎आहे. शिक्षण विभागाने सुमारे ९.८७ कोटी‎रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे‎सादर करूनही अद्याप मंजुरी मिळालेली नाही.‎परिणामी, नव्या शैक्षणिक वर्षाच्या उंबरठ्यावर‎हजारो विद्यार्थी अद्यापही कॅमेऱ्यांच्या‎सुरक्षाकवचापासून वंचित आहेत. शाळांमधील‎सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला‎आहे.‎ बदलापूरसह राज्यातील काही संवेदनशील‎घटनांनंतर शाळांमधील सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा‎ऐरणीवर आला होता. त्यानंतर जिल्ह्यातील‎शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय‎घेण्यात आला. सर्वेक्षणात जिल्ह्यातील तब्बल‎१,५३८ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याचे‎स्पष्ट झाले. तर केवळ ३३२ शाळांमध्ये कॅमेरे‎कार्यरत असल्याची माहिती समोर आली.‎यापार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने प्रथम टप्प्यात‎३९५ महत्त्वाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही‎बसवण्याचा प्रस्ताव तयार करून जिल्हा‎नियोजन समितीकडे पाठवला. मात्र अनेक महिने‎उलटूनही निधी उपलब्ध न झाल्याने योजना‎रखडली आहे. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेबाबत‎पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.‎

सुरक्षा निकषांमध्ये सीसीटीव्हीचा समावेश करण्याची मागणी‎ सध्या शिक्षण हक्क कायदाअंतर्गत‎शाळांसाठी इमारत, वर्गखोल्या, शौचालये,‎पिण्याचे पाणी, ग्रंथालय, क्रीडांगण‎यांसारखे निकष निश्चित आहेत. मात्र‎विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक‎असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा समावेश‎अद्याप बंधनकारक निकषांमध्ये करण्यात‎आलेला नाही. त्यामुळे शाळांनी सुरक्षा‎उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याची टीका‎होत आहे. सीसीटीव्हीला अनिवार्य‎निकषांमध्ये समाविष्ट करण्याची मागणी‎आता जोर धरू लागली आहे. नवीन‎शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी निधी मंजूर‎करून शाळांमध्ये सीसीटीव्ही उभारण्याची‎मागणी पालक, शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील‎जाणकारांकडून होत आहे.‎ खासगी व अनुदानित‎शाळांमध्येही दुर्लक्ष‎ अनेक खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये‎सीसीटीव्ही बसवलेले नसल्याचे वास्तव‎समोर आले आहे. काही ठिकाणी कॅमेरे‎असले तरी त्यांची देखभाल, फुटेज‎साठवणूक आणि नियमित निरीक्षण याकडे‎दुर्लक्ष होत असल्याची माहिती समोर येत‎आहे. ‘देखभाल खर्चाचा भार कोण‎उचलणार?’ या कारणावरून अनेक संस्था‎सीसीटीव्ही यंत्रणेकडे पाठ फिरवत‎असल्याचे दिसून येते.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर