ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

पावसासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मारोबा देवस्थानाला साकडे:पेरणीनंतर पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे चिंता; सामूहिक प्रार्थनेतून चांगल्या पावसाची अपेक्षा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यात अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने अनेक ठिकाणी पिकांच्या उगवणीवर परिणाम होत असून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पावसासाठी मारोबा देवस्थान येथे महाप्रसाद व सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. ऑटो चालक संघटना आणि व्यापारी युनियनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात परिसरातील शेतकरी, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांनीही महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मारोबा देवाच्या चरणी चांगल्या पावसासाठी साकडे घालण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतीला संजीवनी देणारा भरघोस पाऊस पडावा, पिकांची वाढ सुरळीत व्हावी आणि शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना केली. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे कपाशी, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांच्या उगवणीवर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र अनेक भागांत दिसून येत आहे. मारोबा देवस्थान हे परिसरातील श्रद्धेचे केंद्र मानले जाते. पावसाने दडी मारल्यास किंवा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास येथे महाप्रसाद, सामूहिक प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा आहे. या परंपरेतून ग्रामीण भागातील निसर्गाशी असलेले भावनिक नाते आणि सामूहिक श्रद्धेची भावना अधोरेखित होते. मारोबाची परंपरा आजही जिवंत पावसासाठी महाप्रसाद आणि सामूहिक प्रार्थना करण्याची परंपरा मारोबा देवस्थानात अनेक दशकांपासून सुरू आहे. पाऊस लांबल्यास शेतकरी, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटना पुढाकार घेऊन येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि निसर्गाविषयीची कृतज्ञता यांचे अनोखे दर्शन या उपक्रमातून घडते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर