ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सोनसाखळी चोरावर पोलिसांची फिल्मी स्टाइल झडप, व्हिडिओ:’क्राइम पेट्रोल’ पाहून बनला चेन स्नॅचर; 150-200 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी रचला ‘डेड एंड’ सापळा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘क्राइम पेट्रोल’ हा लोकप्रिय गुन्हेगारी मालिकेचा कार्यक्रम पाहून पोलिसांना चकवा देण्याची युक्ती शिकलेल्या एका सराईत चेन स्नॅचरला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अक्षरशः फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करून अटक केली आहे. आरोपी चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी सापळा रचत त्याला जमिनीवर झडप घालून पकडले. या थरारक कारवाईचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित इंगले असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून तो पिंपरी-चिंचवड आणि परिसरात साखळी चोरीच्या घटना घडवत होता. या कारवाईची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेज तपासून मिळाला धागा शहरात सातत्याने वाढत असलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका ताज्या घटनेनंतर तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेच्या युनिट-1 कडे सोपवण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणांवरील तब्बल 150 ते 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासातून आरोपी प्रत्येक चोरीनंतर बाणेरच्या दिशेने पळ काढत असल्याचे आणि बाणेर-पुणे महामार्गाचा वापर करत असल्याचे समोर आले. वेशांतर करून रचला सापळा आरोपीचा मार्ग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी सलग तीन ते चार दिवस त्या परिसरात गुप्त पाळत ठेवली. गुन्हे शाखेचे कर्मचारी वेशांतर करून विविध ठिकाणी तैनात करण्यात आले होते. सकाळच्या सुमारास संशयित आरोपी पोलिसांच्या नजरेस पडला. तो एका बंद रस्त्याकडे अर्थात ‘डेड एंड’ दिशेने वळताच आधीच तयार असलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. काही क्षणांच्या पाठलागानंतर आरोपीला जमिनीवर पाडून ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘क्राइम पेट्रोल’ पाहून शिकला गुन्हेगारीचे धडे पोलिस चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा केला. त्याने कबूल केले की, ‘क्राइम पेट्रोल’ मालिकेतील काही भाग पाहून पोलिसांपासून कसे वाचायचे, पुरावे कसे टाळायचे आणि चोरीची पद्धत अधिक प्रभावी कशी करायची, याबाबत त्याने रणनीती तयार केली होती. सुमित इंगले हा जुना गुन्हेगार असून 2016 ते 2024 या कालावधीत तो सक्रिय होता. त्याच्याविरोधात पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आधीच आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जुगाराच्या व्यसनामुळे पुन्हा गुन्हेगारीकडे जेलमधून सुटल्यानंतर आरोपीने काही काळ सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जुगाराच्या व्यसनामुळे तो कर्जबाजारी झाला आणि पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गावर वळला. गुन्हे करण्यासाठी तो दोन दुचाकींचा वापर करत होता. त्यापैकी एक वाहन स्वतःचे होते, तर दुसरे वाहन तो रोजच्या भाड्याने घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. 15 लाखांचे सोने जप्त; 5 गुन्ह्यांचा उलगडा या अटकेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपीकडून 76 ग्रॅम सोने जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत 15 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. पोलिसांचा संशय आहे की, आरोपीने आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या धाडसी कारवाईचे कौतुक सीसीटीव्हीत कैद झालेल्या या थरारक कारवाईनंतर संबंधित पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपीला जेरबंद करण्यासाठी वापरण्यात आलेली रणनीती आणि वेळेवर केलेली कारवाई यामुळे शहरातील साखळी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर