ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

ओमराजे निंबाळकर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार:उद्धव ठाकरेंचा ओमराजेंना फोन, निंबाळकर म्हणाले – तुम्ही मला मोठे केलंय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या कथित बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड भूकंप झाला असतानाच, आता पुण्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. बंडखोर खासदारांपैकी ५ जण सध्या दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अज्ञातवासात असल्याची माहिती असताना, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मात्र पुण्यात आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचा खटल्याचा काल न्यायालयात निकाल लागल्यानंतर ओमराजे पुण्यातील आपल्या निवासस्थानी परतले. त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन-तीन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ओमराजे यांचे बंड थंड करण्यासाठी आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरे गटाने मध्यरात्री एक मोठी खेळी खेळली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ओमराजे यांच्यावर जाहीर टीका केली असली, तरी पडद्यामागे मात्र त्यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे मध्यरात्री अत्यंत गुप्तपणे ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. राजकीय विश्लेषकांच्या मते, ठाकरे गटाची ही रणनीती अत्यंत महत्त्वाची आहे. जर ओमराजे निंबाळकर यांचे बंड शांत करण्यात ठाकरे गटाला यश आले, तर दिल्लीत असलेल्या उर्वरित ५ बंडखोर खासदारांचे गणित बिघडू शकते आणि त्यांचा गट धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच ठाकरे गटाकडून ओमराजेंना थांबवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली जात आहे. ओमराजे आमच्या पक्षाच्या खासदार या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले की, पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल ओमदादांच्या अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही. त्यामुळे खचलेल्या निंबाळकर परिवाराची विचारपूस करण्यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही आलो होतो. ओमदादा हे आमच्या पक्षाकडून एकदा आमदार आणि तीनदा खासदार झाले आहेत. आजही ते ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदार आहेत. आमच्यात अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली, मात्र प्रत्येक गोष्ट माध्यमांसमोर सांगण्याची गरज नसते. गुपचूप भेटीवर शिंदे गटाची टीका वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांच्या या मध्यरात्रीच्या गुप्त भेटीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण साळी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाच्या या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना किरण साळी म्हणाले, “रात्रीच्या अंधारात गाड्या बदलून, कपडे बदलून आणि तोंड झाकून वरुण सरदेसाई आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आले आहेत. यावरूनच त्यांची हतबलता दिसून येते. एकीकडे त्यांचे प्रवक्ते संजय राऊत जाहीरपणे या खासदारांना गद्दार, खोके आणि अश्लील घाणेरड्या शिव्या देतात; तर दुसरीकडे वरुण सरदेसाई आणि त्यांचे सहकारी मध्यरात्री गुपचूप येऊन त्याच खासदारांच्या पाया पडतात! यांची वैचारिक पातळी किती खाली घसरली आहे बघा.” ‘मिशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा किरण साळी यांनी पुढे बोलताना सांगितले की, गेल्या दोन वर्षांत मातोश्री आणि पक्षाकडून या खासदारांना जी अपमानास्पद वागणूक दिली गेली, ती हे खासदार कधीही विसरणार नाहीत. सार्वजनिक सभांमध्ये आणि पत्रकार परिषदांमध्ये जाहीरपणे शिव्या द्यायच्या आणि मध्यरात्री मनधरणी करायला यायचे, हा ठाकरे गटाचा दुटप्पीपणा आता उघड झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘मिशन टायगर’ आता पूर्णपणे यशस्वी झाले असून, खासदार योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर