ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

गावात सुविधा नाहीत, प्रसुतीसाठी जंगलातून 6 किमी पायपीट:बाळ पोटातच दगावले, मातेचाही करुण अंत; गडचिरोलीतील हृदयद्रावक घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विकसित भारत आणि प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जात असताना, गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या ठिकाणी एका मातेला प्रसूतीसाठी रस्ते आणि डॉक्टरांच्या अभावी आपला प्राण गमवावा लागला आहे. आशा संतोष किरंगा (वय २४) या गर्भवती मातेने आपल्या पोटातील बाळाला वाचवण्यासाठी पतीसोबत ६ किलोमीटरची जंगलमय पायपीट केली, परंतु वेळेत उपचार न मिळाल्याने आधी बाळाचा पोटातच मृत्यू झाला आणि त्यानंतर काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतला. यासंबंधीच्या वृत्तानुसार, एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला गावात राहणाऱ्या आशा किरंगा नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. गावात कोणतीही प्रसूती सुविधा उपलब्ध नव्हती. ऐनवेळी प्रसववेदना सुरू झाल्या तर दवाखान्यात कसे पोहोचायचे, या भीतीने त्यांनी १ जानेवारी रोजी आपल्या पतीसोबत ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेठा (बहिणीचे गाव) येथे जाण्याचा निर्णय घेतला. हे अंतर त्यांनी घनदाट जंगलातून पायी पार केले. गर्भवतीच्या पोटातच दगावले बाळ! २ जानेवारीच्या मध्यरात्री आशा यांना तीव्र प्रसववेदना सुरू झाल्या. आशासेविकेच्या मदतीने त्यांना तातडीने हेडरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे तपासणी केली असता बाळ पोटातच दगावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या धक्क्याने आणि वाढत्या रक्तदाबाने आशा यांची प्रकृती वेगाने खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदनासाठी वणवण धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यूनंतरही या मातेच्या नशिबी असलेली वणवण थांबली नाही. शवविच्छेदनासाठी बाळ आणि मातेचे शव हेडरी येथून मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला, परंतु तिथे स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नव्हते. त्यानंतर दोघांचे मृतदेह पुन्हा ४० किलोमीटर लांब असलेल्या अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. काल शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आला. मृत्यूनंतरही या मातेच्या वाट्याला आलेली वणवण पाहून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेने संपूर्ण राज्य सुन्न झाले असून आदिवासी भागातील आरोग्य सेवेच्या चिंधड्या उडाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दुर्गम भागातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर या घटनेमुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा आणि दळणवळणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही गडचिरोली जिल्ह्यात रस्ता नसल्याने झोळीतून, कावड करून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे अनेकदा समोर आले आहे. प्रगत महाराष्ट्रात आजही एका महिलेला प्रसूतीसाठी जंगलातून पायी प्रवास करावा लागतो आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे जीव गमवावा लागतो, ही बाब अत्यंत लाजिरवाणी ठरली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर