ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पूरग्रस्त क्षेत्रातील 169 गावांत सतर्कता:साथरोग रोखण्यासाठी औषधसाठा, आरोग्य पथके तैनात‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मान्सून काळात पूर, पाणी साचणे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यातील पूरप्रवण व आरोग्यदृष्ट्या संवेदनशील अशा १६९ गावांची निवड केली आहे. तेथे विशेष आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली असून, आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरवर्षी नदीकाठच्या आणि दुर्गम भागातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पाणी साचणे, दूषित पाणीपुरवठा आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने मान्सूनपूर्व नियोजन पूर्ण केले आहे. निवडलेल्या गावांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अतिसार, उलट्या तसेच जलजन्य आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा पाठवण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावनिहाय परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. साथरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने बचाव मोहिमांसाठी ११ रेस्क्यू बोटी, १ हजार लाईफ जॅकेट्स आणि ८५० लाईफ रिंग्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्यविषयक मदतीसाठी ५ हजार प्रथमोपचार किट्सचा साठा करण्यात आला आहे. रुग्ण व जखमींच्या स्थलांतरासाठी ३२० स्ट्रेचर उपलब्ध आहेत. याशिवाय ४० इमर्जन्सी टॉर्च आणि २ हजार ५०० अग्निशमन यंत्रे विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर