ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

आ. राजू तोडसाम यांच्या पत्नीच्या वाहनाला धडक:प्रिया तोडसाम यांच्यासह इतर जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपूर-तुळजापूर महामार्गावरील गोधणी चौफुलीलगत असलेल्या हनुमान मंदिराजवळ शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात घडला. एका भरधाव आणि अनियंत्रित १४ टायर ट्रकने आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम यांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेनंतर ट्रक दुसऱ्या एका उभ्या वाहनावर जाऊन आदळला. या अपघातात प्रिया तोडसाम यांच्यासह वाहनातील इतर व्यक्ती जखमी झाल्या असून, त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-तुळजापूर महामार्गावर गोधणी गावाजवळील हनुमान मंदिराजवळ एक सहाचाकी ट्रक क्रमांक (एमएच १०, एडब्ल्यू ४५३७) रस्त्याच्या कडेला उभा होता. यावेळी नागपूरच्या दिशेने येत असलेल्या एका १४ चाकी ट्रकने क्रमांक (एमएच ४०, बीजी १६३७) अचानक ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या प्रिया तोडसाम यांच्या वाहनाला क्रमांक (एमएच ४९ सीएल ६७५०) भीषण धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की, स्कार्पिओचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. यामध्ये आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम या जखमी झाल्या. फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर