ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती:तिवसा प्रकल्पाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


स्वच्छतेच्या क्षेत्रात विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या तिवसा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावासुद्धा घेतला. जिल्हाधिकारी येरेकर यांनी प्रकल्प परिसरात करण्यात आलेल्या विकासकामांचे, स्वच्छतेचे तसेच सौंदर्यीकरणाच्या उपक्रमांचे कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा वि द्यार्थ्यांसाठी अभ्यासदौऱ्याचे केंद्र बनू शकतो, या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या उर्वरित जागेवर सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून हरित परिसर विकसित करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. यासोबतच बगीचा, मुलांसाठी खेळणी, झुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्याच्या शक्यताही तपासण्यास सांगितले. भेटीदरम्यान त्यांनी तिवसा शहराच्या पाणीपुरवठा योजनेची माहिती घेतली. पुढील महिन्यात नगराध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नमो उद्यानाच्या कामांची माहिती घेऊन विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा गौरखेडे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक वैभव वानखडे, तहसीलदार मयूर कळसे, मुख्याधिकारी शिवदास मुसळे, नायब तहसीलदार आशिष नागरे, नरेंद्र कुरळकर, अमोल देशमुख, अधीक्षक रोहन राठोड, अभियंता दयानंद डेहनकर, पाणीपुरवठा अभियंता ऋषिकेश देशमुख, स्वच्छता निरीक्षक राहुल इमले, कर निरीक्षक विकास गावंडे, सूरज शापामोहन, स्वच्छता दूत आशिष नांदगावकर, माऊली कन्सल्टंट प्रा.लि.चे संचालक उमेश राऊत तसेच तिवसा शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. विलगीकरणासाठी निधीची गरज घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर कचरा विलगीकरणाचे काम बंद असल्याचे लक्षात आल्यावर जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांशी त्या मुद्द्यावरही चर्चा केली. निधीची उपलब्धता नसल्याने हे काम बंद असल्याचे नगरपंचायत प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उन्नतीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर