ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

पाणी पुरवठ्यासाठीपंचायत समितीचा 9.89 कोटी रुपयांचा “मास्टर प्लॅन’:टंचाई निवारणासाठी प्रशासनाचे नियोजन, 11 गावांना दिलासा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ग्रामीण भागातील जनतेला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पुसद पंचायत समितीने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये म्हणून तब्बल ९ कोटी ८९ लाख ८५ हजारांचा टंचाई निवारण आराखडा मंजूर करण्यात आला आहे. संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच विहीर अधिग्रहणासारख्या ठोस उपाययोजनांना सुरुवात केली आहे. जून महिन्याची सुरुवात झाली असली, तरी टंचाईच्या १३५ झळा कमी न होता वाढू लागल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या १७७ गावांच्या १३० वस्त्यांमधील १ लाख ६३ हजार ८९९ नागरिकांना प्रतिदिन, प्रतिव्यक्ती ४० लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता ७३ कायमस्वरूपी सार्वजनिक विहिरी, १०७ खासगी विहिरी, १४० हातपंप यासह इतरही काही माध्यमाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दरवर्षी भूजल पातळी घटल्यामुळे अनेक गावांमध्ये हे स्रोत कोरडे पडतात, परिणामी टंचाई निवारण उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागते. दरवर्षी तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवते. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने जलजीवन सारख्या महत्त्वपूर्ण योजना तालुक्यात राबवल्या आहेत. परंतु त्या योजनेला सध्या तिलांजली देण्याचे काम अधिकारी व ठेकेदारामार्फत केल्या जात आहे. कोट्यावधी रुपये खर्च होत असताना देखील याचा नाहक त्रास ग्रामीण भागात विशेष करून माळ पठार भागातील जनतेने सोसावा लागत आहे. तालुक्यातील गावांसाठी ११ टँकरने पाणीपुरवठा करण्याची तरतूद आहे. यासाठी ९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यातून गावांमधील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, वरिष्ठ सहाय्यक सुरेश राठोड यांनी सांगितले. वडसद, कारला (देव), बुटी, रामपूरनगर, जवळी, येलदरी, गायमुखनगर, वेणी (खुर्द), शिवानगर, बाळवाडी, ब्राह्मणगाव आदी ११ गावांत इतर स्रोत उपलब्ध असतानाही उन्हाळ्यात गावकऱ्यांची तहान भागत नाही. निधी जातो तरी कुठे? कारण मृदू व जलसंधारण विभागाची मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून अनेक गावांत पाणीटाकी, नळयोजना सुरू झाल्या. दरवर्षी पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधींचा खर्च होतो. यामुळे टंचाईची भीषणता काही प्रमाणात कमी झाली असली तरी कोट्यवधींचा खर्च केल्यानंतरही उन्हाळा आला की परिस्थिती “जैसे थे’ निर्माण होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर