ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

साने मुसलमानांमुळे निवडून आला:आमदार बाई भेटू देत नव्हती, गिरीश महाजन – राहुल ढिकले यांच्या संवादाची क्लिप व्हायरल; VIDEO

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतांमुळे भाजपचा अजिंक्य साने नामक उमेदवार निवडून आल्याचा दावा करणारा मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मंत्री महाजन ‘आमदार बाई भेटू देत नव्हती’ असे विधान करतानाही दिसून येत आहेत. यावेळी त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत जागावाटप व त्यानंतर उमेदवारी देण्याच्या मुद्यावरून भाजपमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला. मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीच्या तोंडावर अनेकांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचे तीव्र पडसाद उमटले. आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकदा तर त्यांच्या डोळ्यांत अश्रूही दाटून आले होते. त्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीमुळे जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी एक व्हिडिओ पोस्ट केला. काय म्हणाले संजय राऊत? या व्हिडिओत मंत्री गिरीश महाजन व आमदार राहुल ढिकले पत्रकार परिषदेपूर्वी आपसात संवाद साधताना दिसून येत आहेत. त्यात राहुल ढिकले व गिरीश महाजन अजिंक्य साने नामक उमेदवार मुस्लिमांमुळे निवडून आल्याची चर्चा करताना दिसून येत आहेत. संजय राऊत आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार. राहुल ढिकले म्हणत आहेत साने निवडून आला महंजे अवघड आहे, तुमची कृपा. त्यावर गिरीश महाजन म्हणतात, मुसलमानांनामुळे झाला *चिपड्या*. बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना काय महंतो/ अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो… आमदार बाई भेटू देत नवती, असे महाजन सांगत आहे. या व्हायरल क्लिपची नाशिकच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. देवयानी फरांदे यांचा नामोल्लेख टाळत टीका उल्लेखनीय बाब म्हणजे महाजन या व्हिडिओत आमदार बाई भेटू देत नव्हती, असे म्हणत आहेत. ही आमदार बाई म्हणजे भाजप आमदार देवयानी फरांदे असल्याचा दावा केला जात आहे. फरांदे यांनी या व्हिडिओवर अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. पण त्या गत काही दिवसांपासून मंत्री महाजनांवर प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या नाराजीतूनच त्यांनी ठाकरे गट व मनसेच्या बड्या नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश देण्यास विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर