ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

भिवंडीत 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार:खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक, कशेळीतील धक्कादायक घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात घराखाली भावासोबत खेळत असलेल्या अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून संतापलेल्या शेकडो नागरिकांनी नारपोली पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करत आरोपीच्या थेट ‘एन्काऊंटर’ची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित चिमुरडी तिच्या लहान भावासोबत घराखाली खेळत होती. यावेळी कशेळीतील एका इमारतीत राहणाऱ्या नराधमाने तिला खाऊ खाण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले आणि आपल्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर नराधमाने मुलीच्या लहान भावाला पाणी आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले. भाऊ बाहेर जाताच आरोपीने चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अघोरी कृत्यानंतर पीडित मुलीची प्रकृती खालावली. तिने रडत रडत आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीची गंभीर अवस्था पाहून पालकांना मोठा धक्का बसला. त्यांनी विलंब न करता तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांकडून आरोपीला अटक पालकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने नारपोली पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. गुन्हा करून शहरातून फरार होण्याच्या बेतात असलेल्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, पीडित चिमुरडीला तातडीने भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. नागरिकांची पोलिस ठाण्याबाहेर गर्दी या घटनेची माहिती कशेळी परिसरात पसरताच स्थानिक महिला आणि नागरिकांनी नारपोली पोलिस ठाण्याबाहेर प्रचंड गर्दी केली. नागरिकांच्या संतापाचा बांध फुटल्याने त्यांनी पोलिसांसमोरच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अशा नराधमांना कोर्टात नेऊन ‘तारीख पे तारीख’ देण्याची गरज नाही, त्यांची जागेवरच थेट न्याय करा किंवा एन्काऊंटर करा, अशी संतप्त मागणी महिलांनी लावून धरली. दरम्यान, संबंधित आरोपी कशेळीतील एका इमारतीमध्ये ‘बॅचलर’ म्हणून राहत होता. घरमालकाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर पडताळणी किंवा अधिकृत भाडेकरू करार न करताच त्याला बेकायदेशीरपणे घर भाड्याने दिल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाचा नारपोली पोलिस अधिक तपास करत आहे. हे ही वृत्त वाचा कल्याणमध्ये ‘टोमॅटो देतो’ असे सांगून 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार दरम्यान दोन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका 50 वर्षीय नराधमाने अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.जुमेया अली शेख (वय 50) असे या आरोपीचे नाव आहे. या नराधमाने परिसरातीलच एका पीडित 7 वर्षीय चिमुरडीला ‘टोमॅटो देतो’ असे आमिष दाखवून फूस लावली. चिमुरडी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून घरात गेली असता, घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर