ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

रात्र वैऱ्याची आहे, आता तरी जागा हो:एक आहे तर सेफ आहे! नांदगावकर-राऊतांची भावनिक साद, नीतेश राणेंचाही पलटवार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा धडाकेबाज प्रचार मंगळवारी थंडावला असून, आता संपूर्ण मुंबई मतदानाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शब्दयुद्ध’ छेडले आहे. एकीकडे मनसे नेते बाळा नांदगावकर आणि खासदार संजय राऊत यांनी ‘मराठी अस्मिते’चे कार्ड खेळत भावनिक साद घातली. तर दुसरीकडे भाजप आमदार नीतेश राणे यांनी ‘हिंदुत्वा’च्या मुद्द्यावरून मतदारांना साद घातली आहे. बाळा नांदगावकरांची पोस्ट काय? मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुकवर एक अत्यंत भावुक आणि राजकीयदृष्ट्या सूचक पोस्ट शेअर केली आहे. बाळा नांदगावकर आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, रात्र वैऱ्याची आहे, आता तरी जागा हो. उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान करताना फक्त 2 मिनिटे शांत चित्ताने विचार करा की ही निवडणूक किती महत्त्वाची आहे. यावेळी मराठी माणूस चुकला तर मग पुन्हा संधी नाही. ठाकरेंना जर सत्तेसाठी एकत्र यायचे असते तर ते कधीच आले असते. पण केवळ आपल्या माय मराठी साठी आपल्या महाराष्ट्र धर्मा साठी ही लढाई किती महत्त्वाची आहे हे जाणून ते नेक इराद्याने एक आले आहे. समोरील विरोधक बलाढ्य, धनदांडगे, सत्ताधारी असले तरी आपण एकीने , ठाकरेंच्या बरोबरीने लढलो तर आपण त्यांना हरवू शकतो. माझ्या एका मताने काय होईल असा विचार न करता मी अजून किती जणांना सांगू शकतो ते बघा आणि सर्व ताकद आपल्या माणसांसाठी लावा. ही विनंती केवळ मुंबईतील नागरिकांना नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आहे. रात्र वैऱ्याची आहे पण या अंधार रात्री नंतर जी आशेची किरण घेऊन येणारी सकाळ आहे ती सोनेरी आहे. मी महाराष्ट्रासाठी खारीचा वाटा उचलत आहे, तुम्हीही पुढे या. संजय राऊतांचा ‘ठाकरे ब्रँड’वर विश्वास दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला जय महाराष्ट्र असे कॅप्श्न दिले असून, सर्व मराठी माणसांचे ठरलंय, एक आहे तर सेफ आहे! आणि ठाकरेच बेस्ट आहे! असा संदेश देत, मराठी मतदारांना भावनिक साद घातली आहे. नीतेश राणेंचा पलटवार : “हिंदूंच ठरलंय!” एकीकडे ठाकरे गट आणि मनसेकडून मराठी माणसाला एकत्र येण्याचे आवाहन होत असताना, भाजप आमदार नीतेश राणे यांनी याला ‘हिंदुत्वा’च्या मुद्द्याने प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर “हिंदूंच ठरलंय, आय लव्ह महादेवच…” असा मजकूर असलेली पोस्ट शेअर केली आहे. नीतेश राणे यांनी या पोस्टद्वारे मुंबईकरांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता मुंबईकर कोणाच्या पारड्यात आपले दान टाकणार, हे उद्या स्पष्ट होईल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर