ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सेपक टकरॉ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अमरावती जिल्ह्याला उपविजेतेपद:ज्युनिअर व सीनियर सेपक टकरॉ स्पर्धेमध्ये खेळाडूंनी मिळवले यश‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नुकत्याच नागपूर येथे झालेल्या ”सेपक टकरॉ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत” अमरावती जिल्हा मुलींच्या संघातील खेळाडूंनी यंदाची ज्युनिअर व सिनियर स्पर्धा जोरदार खेळाद्वारे गाजवली. प्रचंड गर्मी आणि समोर बलाढ्य संघ असूनही, अमरावतीच्या स्टार सेपक टकरॉ खेळाडूंनी अद्वितीय खेळ सादर करत राज्यात उपविजेतेपद पटकावले. मुलींच्या ज्युनिअर संघाने लीग सामन्यांमध्ये नाशिक, भंडारा आणि यवतमाळ संघांचा धुव्वा उडवला. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात नांदेडचा, तर उपांत्य सामन्यात वर्धा संघाचा दणदणीत पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात सोलापूरकडून पराभव पत्करावा लागल्याने संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.सिनियर मुलींच्या संघाने पहिल्याच सामन्यात बलाढ्य नांदेड संघाचा पराभव करून सर्वांना धक्का दिला. पुढे वाशीम आणि यवतमाळ संघांना पराभूत करत अंतिम सामन्यात सोलापूर संघाला अटीतटीची लढत दिली व उपविजेतेपद मिळवले. मिक्स इव्हेंटमध्ये बलाढ्य नाशिक संघाचा पराभव करत अमरावतीने अंतिम फेरीत सोलापूरला टक्कर दिली व उपविजेतेपद (रजत पदक) पटकावले. ”रेगु इव्हेंट”मध्येही उत्कृष्ट खेळ करत तृतीय स्थान व रजत पदक पटकावले. अमरावतीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्याध्यापिका अर्चना लुंगे, जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. सुगंध बंड, डॉ. हरीश काळे, आनंद उईके, अतुल पडोळे, हेमंत देशमुख, तेजस कातखेडे, प्रफुल गाभने यांच्यासह सर्व क्रीडाप्रेमी व पालकांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.यशस्वी संघात राष्ट्रीय खेळाडू भक्ती चौधरी, अंशिका दिवाण, श्रावणी लोणारे, आयुषी दिवाण, जेसिका काळे, आकांक्षा ठोके, अंजली राठोड, अक्षरा तायवाडे, नैन्सी जैस्वाल, आरती मरस्कोल्हे, आदिश्री पडोळे, परीधी तिडके, आनंदी राऊत, वैष्णवी जीवतोडे, आरुषी शिंगाडे, गौरी जोहारे, संज्योत चिपडे आणि पूर्वी बिहान या खेळाडूंचा समावेश होता. नियमित सराव हेच यशाचे गमक ः मुलींचा हा संघ जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य व मुख्य प्रशिक्षक डॉ. हनुमंत लुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर नियमित सराव करतो. कडक उन्हातही घेतलेले अथक परिश्रम आणि नियमित सराव हेच या दोन्ही संघांच्या देदीप्यमान यशाचे मुख्य गमक ठरले आहे. विशेष बाब अशी की, बहुतेक खेळाडू या कस्तुरबा कन्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर