ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अमरावती विमानतळावर नाईट लॅण्डींग:धावपट्टीवर लाईट्ससह डीव्हीओआर यंत्रणेचे काम पूर्ण, रात्री विमानोड्डाण केव्हा याबाबत अनिश्चितता‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बेलोरा विमानतळावरून रात्री विमानोड्डाण केव्हा होणार याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. रात्री विमानोड्डाणासाठी आवश्यक डॉपलर व्हीएचएफ ओम्नीडायरेक्शनल रेंज (डीव्हीओअर) यंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याची यशस्वी चाचणी देखील झाली आहे. धावपट्टीवर लाईट्सही बसवण्यात आले असून, विमान हवेत झेपावण्यासह धावपट्टीवर उतरण्यासाठी आवश्यक या दोन्ही महत्त्वपूर्ण दिशादर्शक, मार्गदर्शक यंत्रणा बसवण्याचे काम अगदी अचूक पूर्ण झाले आहे. डीजीसीएचा तांत्रिक विभाग व अभियंत्यांकडून या यंत्रणेची पडताळणीही झाली आहे. तरीही रात्री विमानोड्डाण केव्हा होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. रात्री विमानोड्डाणाचा परवाना डीजीसीएकडून महाराष्ट्र विमान प्राधिकरणाला घ्यावा लागतो. यासाठी संपूर्ण कारवाई झाली आहे. काही तांत्रिक कामे शिल्लक असून, कागदपत्रांच्या पुर्ततेतच दिवस निघून चालले आहेत. रात्री विमान धावपट्टीवर उतरवून (लॅण्डींग) नंतर विमानाच्या उड्डाणाची प्राथमिक चाचणी एकदा अचूकपणे झाली की, बेलोरा विमानतळावरून दिवसा व रात्री विमानोड्डाणाची सोय होईल. ही‎बाब अमरावतीकरांसाठी सुविधाजनक ठरेल.‎मात्र, डीजीसीएने हिरवी झेंडी दिली नसल्याने‎बेलोरा विमानतळावरून नेमके केव्हा रात्री‎विमानोड्डाण सुरू होईल, याबाबत‎अनिश्चितता आहे. आधी मे च्या शेवटपर्यंत‎रात्री विमानोड्डाण सुरू होईल, असे सांगितले‎होते. परंतु, आता जूनचा पंधरवडाही सुरू‎झाला आहे. तरी काहीच हालचाली दिसत‎नसल्याचे चित्र आहे.‎ रात्री विमानोड्डाणाचे शहराला होणारे‎फायदे शहरात पीएम मित्रा टेक्सटाइल पार्कचे‎काम सुरू झाले असून,या निमित्ताने कंपन्यांचे‎प्रतिनिधी सतत ये-जा करीत असतात.‎राजकीय नेत्यांनाही अंधार पडण्याच्या आधी‎कामे, सभा, बैठक आटोपून किंवा अर्धवट‎सोडून मुंबईकडे निघावे लागते. कारण,‎मुंबईकडे जायचे असेल तर नागपूर‎आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे रवाना व्हावे‎लागते. अशात जर अमरावतीहूनच रात्री‎विमानोड्डाणाची सोय झाली तर ती सर्वांसाठी‎सुविधाजनक ठरणार असून कोणालाही‎नागपुरात जावे लागणार नाही. वेळ, खर्च,‎दगदग सर्वकाही वाचेल. आरामात‎अमरावतीहूनच मुंबईकडे रवाना होता येईल.‎ऐनवेळी कोणाला कामासाठी मुंबईला जायचे‎असेल तर त्याचीही सोय होईल.‎‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर