ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

“खान्देश एक्स्प्रेस’मुळे जळगाव ते संभाजीनगर प्रवास तासाभरात शक्य:नव्या सहापदरी महामार्गाचा सर्वेक्षण अहवाल तयार, 61 गावांतील 1600 हे. जमिनीचे संपादन

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खान्देश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पहिल्या ‘ग्रीनफील्ड’ सहापदरी महामार्गाचा सर्वेक्षण अहवाल तयार झाला आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून सुरू होणारा हा महामार्ग छत्रपती संभाजीनगरजवळील चौका गावाजवळून ‘सावंगी इंटरचेंज’द्वारे थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. या 105 किमी लांबीच्या महामार्गामुळे जळगाव ते संभाजीनगरचे अंतर 50 किमीने कमी होणार असून, साडेतीन तासांचा प्रवास 120 किमी प्रतितास वेगाने अवघ्या एका तासावर येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दोन्ही जिल्ह्यांतील 8 तालुक्यांमधील 61 गावांच्या शिवारातून सुमारे 1600 ते 1700 हेक्टर जमीन संपादित केली जाईल. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 670 हेक्टर तर संभाजीनगर जिल्ह्यातील 950 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या मार्गावर पाचोरासह दोन ठिकाणी इंटरचेंज, दोन नद्यांवर पूल आणि एका रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. छत्रपती संभाजीनगर जिल्हा (4 तालुके – सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री): घोसला, नांदगांव, घाटनांद्रा, लोहगाव, रायगाव, वाकद, शेलगाव (जहांगरी), दहीगाव, आडगाव (पिशोर), नाचनवेल, कोपरवेल, सारोळा, डोंगरगाव, कान्हेगाव, चिचोली नकीब, सोनारी खु., वावणा, निधोणा, वाहेगाव, डोंगरगाव शिव, पिंपळगाव वळण, वाणेगाव खु., वारेगाव, किनगाव, गणोरी, मुर्शिदाबाद वाडी आणि चौका. या शिवारातून जाणार महामार्ग जळगाव जिल्हा (5 तालुके – धरणगाव, एरंडोल, जळगाव, पाचोरा): टहाकळी, पाळधी बु., पाळधी खु., सावडे प्र.चा., पिंपळकोठे प्र.चा., खेडी खु., रवंजे खु., रवंजे बु., दापोरी, लमांजन, कुऱ्हाडदे, वाकडी, म्हसावद, बोरनार, डोमगांव, पाथरी, सामनेर, लासगांव, आसनखेडे खु., नांद्रा, पहान, मोहाडी, नाईकनगर, सांगवी प्र. लोहारे, साजगाव, लोहारी बु., वरखेडी बु., लासुरे, वाणेगाव, राजुरी बु., वाडी, शिंदाड व गहुले. व्यापार-उद्योगाची ‘लाइफलाइन’… हा गुजरात आणि मध्य प्रदेशातून थेट पुणे, मुंबई किंवा दक्षिण भारताकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी हा मार्ग ‘लाइफलाइन’ ठरणार आहे. यामुळे इंधन आणि वेळेची मोठी बचत होईल, तसेच जळगाव जिल्ह्यातील केळी आणि मसाले यांसारखी कृषी उत्पादने अवघ्या काही तासांत मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचवणे शक्य आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर