ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हिंगोलीत वादळामुळे गोदाम कोसळले:कोट्यवधींचा हरभरा धोक्यात; अधिकाऱ्यांच्या ‘अफवा’ जपामुळे संशय बळावला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीच्या गोदामात वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेले गोदाम वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर शासनाचे कोट्यावधीचे नुकसान आहे. मात्र या नुकसानीची माहिती देतांना अफवांवर विश्‍वास ठेऊ नका असे ओरडून सांगणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदाम भाड्याचे गौडबंगाल संशोधनाचा विषय बनले आहे. त्यामुळे आता नेमक्या अफवा काय आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने गोदाम भाडेतत्वावर घेऊन त्यामध्ये नाफेडने खरेदी केलेला 40 हजार क्विंटल हरभरा ठेवण्यात आला आहे. मात्र शनिवारी ता. 13 वादळी वाऱ्यामुळे गोदामाचे टीनपत्रे उडून गेल्याने हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. या संदर्भात प्रसार माध्यमांतून बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक निलेश लांडे यांनी तातडीने प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. यामध्ये गोदामात साठवलेल्या या हरभरा पिकाची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेमुळे शेतकऱ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. मात्र या साठ्याचे नुकसान होऊन शासनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने संपूर्ण साठ्याचा विमा उतरविला आहे. नुकसानीची पाहणी विमा कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या साठ्याचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभाग प्रमुख, लातूर, साठा अधीक्षक जवळा बाजार तसेच इतर अधिकारी व प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित राहून गोदामातील साठा सुरक्षितपणे अन्य गोदामांमध्ये हलविण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत. महामंडळाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्‍वास ठेऊ नका दरम्यान, महामंडळाकडून देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नका असे ठासून सांगितले जात आहे. मात्र गोदामातील साठा शेतकऱ्यांचा नव्हता, शेतकऱ्यांना पैसेही मिळाले आहे. मात्र आता अफवा कोणत्या पसरविल्या जात आहे याची उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार अफवांवर विश्वास ठेऊ नका असे का सांगितले जात आहे, या अफवांमध्ये कोणते गौडबंगाल लपले आहे हा संशोधनाचा विषय बनला आहे. त्यामुळे आता या गोदामाच्या भाडेतत्वापर घेण्याचीच चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर