ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शिवसेना-भाजप वेगळे नाहीत, आम्ही एकाच विचारधारेचे:लोकप्रतिनिधींनी साथ सोडल्यावर उद्धव ठाकरेंना पदाधिकारी आठवले – योगेश कदम

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेनेची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढण्यासारखेच आहे, कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत. शिवसेना आणि भाजपला आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही, आम्ही एकाच विचारधारेवर चालणारे दोन पक्ष आहोत, असे शिवसेना नेते योगेश कदम यांनी म्हटले आहे. ठाकरे गटातील सहाव्या खासदार शिंदे गटात येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याची माहिती आहे यावर बोलताना कदमांनी असे म्हटले आहे. योगेश कदम म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. ते ज्या पद्धतीने संघटना चालवत आहेत ते सर्वांनी पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते विधानसभेपेक्षाही जास्त फिरले आणि कार्यकर्त्यांची पाठिशी उभे राहिले हे देखील खूप महत्त्वाचे आहे. ..तेव्हा दौरा का केला नाही योगेश कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे हे सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत, तो केल्याने काही फरक पडेल असे मला वाटत नाही. धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होती त्यावेळी उद्धव ठाकरे प्रचारासाठी का गेले नाही. त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर का सोडले? लोकप्रतिनिधींना साथ सोडल्यावर त्यांना स्थानिक पदाधिकारी आठवत आहेत, पण ते जेव्हा निवडणुकीला सामोरे जात होते त्यावेळी उद्धव ठाकरे का गेले नाही? असा सवाल कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरे केवळ सोयीचे राजकारण करणार का? हा प्रश्न उपस्थित होतोच ना. ..तर दानवेंमध्ये बदल होईल अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीसोबत लढवत आहेत, त्यावर बोलताना योगेश कदम म्हणाले की, सहकारी बँकेच्या निवडणुका या राजकारण विरहित होत असतात. पण अंबादास दानवे यांना एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी जी मदत केली आहे, याची जाणीव जर त्यांनी ठेवली तर त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. संबंधित बातमी वाचा… महाविकास आघाडीच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी:पावसाळी अधिवेशनादरम्यान एकजुटीवर प्रश्नचिन्ह; नेत्यांनी दिली स्पष्टीकरणे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून सरकारच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) बोलावलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश असल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या गैरहजेरीची दखल घेत ‘आपल्यात खरोखर एकी आहे का?’ अशी चिंता व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर