ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

ऑपरेशन टायगरमध्ये तानाजी सावंतांची मोठी भूमिका?:ओमराजेंना पुण्यातून चार्टर्डने दिल्लीला नेल्याचा सुषमा अंधारेंचा दावा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी बंड केले आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची विशेष चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर दावा करत, ओमराजे निंबाळकर यांना पुण्यातून दिल्लीला नेण्यासाठी आमदार तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतल्याचे म्हटले आहे. तसेच, या संपूर्ण घडामोडींची तयारी १० जूनलाच दिल्लीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला. पुण्यातून मध्यरात्री चार्टर्ड विमान आलं, तानाजी सावंत लीड करत होते शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण ‘ऑपरेशन’ची इनसाईड स्टोरी उघड केली. अंधारे म्हणाल्या, “खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा रुग्णालयात दाखल असल्याने ते पुण्यात होते. मात्र, काल मध्यरात्री त्यांना दिल्लीला नेण्यासाठी पुण्यात खास चार्टर्ड विमान आले. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत या संपूर्ण मोहिमेचे लीड करत होते. तानाजी सावंत, नानासाहेब पाटील, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे स्वतः त्या चार्टर्ड विमानातून दिल्लीला रवाना झाले. 10 जूनला दिल्लीतील हॉटेलमध्ये शिजला कट सुषमा अंधारे यांनी बंडखोरांच्या गुप्त बैठकीची तारीख आणि ठिकाण जाहीर करत खळबळ उडवून दिली. दिल्लीतील ‘हॉटेल मान्सून’मध्ये १० जून रोजीच या संदर्भात पहिली महत्त्वाची बैठक पार पडली होती. प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थ पाहून हा निर्णय घेतला आहे. ओमराजे जर पक्षात नाराज नव्हते, तर ते स्वतः समोर येऊन आपली भूमिका का स्पष्ट करत नाहीत?” असा थेट सवाल अंधारेंनी केला. दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ? ओमराजेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही, अशी माहिती अंधारेंनी दिली. त्यानंतर त्यांनी ओमराजेंचे खंदे समर्थक आणि सावलीसारखे सोबत असणारे आमदार कैलासदादा पाटील यांना फोन केला. त्यावर कैलास पाटील यांनी दिलेले उत्तर बरेच काही सांगून जाणारे आहे. पाटील अंधारेंना म्हणाले, “ताई, मी स्वतःची गॅरंटी देऊ शकतो, दुसऱ्यांची गॅरंटी मी कशी देऊ?” आमदार कैलास पाटलांच्या या संदिग्ध विधानामुळे ओमराजे निंबाळकर ठाकरे गटातून अधिकृतपणे बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. नाराज तानाजी सावंतांवर होती मोठी जबाबदारी विशेष म्हणजे, महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने आमदार तानाजी सावंत गेल्या काही काळापासून नाराज होते. मात्र, ‘ऑपरेशन टायगर’मध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोबत आणण्याची मोठी जबाबदारी सोपवली होती. तानाजी सावंतांच्याच मतदारसंघातून ओमराजेंनी लोकसभेला मोठी आघाडी घेतली होती, त्यामुळे सावंतांनी ही फिल्डिंग अचूक लावत ठाकरेंना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा सुरुंग लावला आहे. ठाकरेंचा पक्ष फुटला, राऊतांची पत्रकार परिषदेत शिवीगाळ:9 पैकी 6 खासदारांचा वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना सोपवले पत्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (यूबीटी) नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी बंड केले आहे. सूत्रांनुसार, या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी ९:३० वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून शिंदे गटाच्या शिवसेनेत विलीनीकरणाची विनंती केली आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर