ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य:उद्या मराठी पुरस्कार घेताना ‘भैय्या’ दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे जोरदार टीकास्त्र

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज, तुम्ही एकत्र राहू नये हे सत्ताधाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, राज ठाकरे मराठी भाषेबद्दल बोलतो ते लोकांसाठी बोलतो, पश्चातापाचा हाथ मारून काही फायदा नाही. सध्या भैय्यांना मराठी शिकवायचं चाललं आहे. भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील. महाराष्ट्रात राज्यकर्ते शाळा विकत चालले असतील तर तो शाळांचं जागेचा विषय आहे. मराठी माध्यमांचा शाळा ज्या जागेवर आहे तिथल्या जागांवर लक्ष आहे. आयपीएल मध्ये गुंतवून ठेवायचं, कुठेतरी कॉन्सर्ट मध्ये गुंतवून ठेवायचं पण सरकारला प्रश्न विचारू नका हे सध्या चित्र सुरू असल्याचे ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, पत्रकारितेतून मी आलो आहे. अनेक ठिकाणी मी काम केलं आहे. घरातच माझ्या ती गोष्ट होती. पत्रकारिता बदलली आहे, यात काही संशय नाही. तुम्ही किती गोष्टी दाखवा, किती लिहा पण सरकारला काही त्याचा फरक पडत नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. अनेक चांगले पत्रकार मंत्र्यांकडे काम करत आहेत. तुम्ही लिहित राहाल, बोलत राहाल पण त्याने सत्ता जाते सत्ता येते हा समज असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आत्ताची परिस्थिती दिसेल त्याची जमीन असा विषय सुरु आहे. आज पुण्याची अवस्था बघा. मूळ पुणे वेगळं, काही आकार उकार नाही. पुण्यात पाणी तुंबणार कारण कोणाचे लक्षच नाही. मुंबईत हजारो एकर जागा गोदरेजची आहे. सरकारी जमिनीवर अनधिकृत कामं कशी झाली? कुठल्याच नगरसेवकाला, आमदाराला आपलेपणाची भावना राहिली नाही. हावरटपणा आणि बजबजपुरी सुरु आहे. अदानी विषय मांडून पुढे काय झालं? पत्रकारांनी तो विषय का नाही धरुन लावला? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, सर्व पत्रकारांना सांगणे आहे की दबाव आला तर त्यांच्या बातम्या टाकने बंद करा. जिथे जमीन भुसभुशीत असतात तिथेच घुशी होतात, खडकात घुशी होत नाहीत असेही राज ठआकरे म्हणाले. संयुक्त महाराष्ट्र झाला तो म्हणजे 1 मे पण महाराष्ट्र दिन दिवशी मुंबईतल्या मराठी लोकांना बाहेर येऊन वंदन करण्याची जाणीव नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर