ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

‘सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा बाहेर येणार नाही’:नंदुरबारमध्ये शेतकऱ्याचे विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन; सैताने गावात तणाव

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, नंदुरबार तालुक्यातील सैताने येथील शेतकरी प्रमोद पाटील यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणाला फसवे ठरवत ‘सरसकट कर्जमाफी’च्या मागणीसाठी आजपासून थेट अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या आक्रमक पावलामुळे प्रशासनासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सरसकट कर्जमाफी देण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मी या विहिरीतून बाहेर येणार नाही आणि अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही, असा इशारा प्रमोद पाटील यांनी विहिरीतूनच प्रशासनाला दिला आहे. हा संवेदनशील प्रकार सुरू असताना आंदोलन रोखण्यासाठी घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिस आणि प्रशासनाच्या पथकाला आक्रमक गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला. ज्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण होऊन पोलिस आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक आणि वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. सध्या पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी सैताने गावात तळ ठोकून असून, विहिरीत उतरून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याची समजूत काढून त्याला सुरक्षित बाहेर काढण्याचे आणि आंदोलन मागे घेण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीन दिवस अन्नत्याग उपोषण देखील केले होते. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची समजूत काढली तसेच त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पवारांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. रविकांत तुपकरांचे बुलढाण्यात उपोषण रोहित पवारांच्या उपोषणानंतर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील उपोषणाला सुरुवात केली आहे. 15 जून पासून रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आता आरपारच्या लढ्याचा एल्गार पुकारला आहे. आश्वासनांची फसवणूक, जाचक अटींची कर्जमाफी आणि पिकविम्याच्या नावाने सुरू असलेला अन्याय या विरोधात हा संघर्ष असल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे. तसेच जीव गेला तरी बेहत्तर.. पण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पिकविमा मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असेहीह त्यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर