ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अवघ्या दोन तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख; ‘विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क’च्या वृत्ताचा परिणाम

18 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जळका शिवारातील खळबळजनक प्रकरणाचा उलगडा; मृतक राहुल जोशी असल्याची पोलिसांची पुष्टी

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील जळका शिवारात रोडलगत असलेल्या नालीमध्ये आढळलेल्या अज्ञात पुरुषाच्या मृतदेहाची ओळख अवघ्या दोन तासांत पटल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. ‘विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क’ने मृतदेहाबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित माहिती मृतकाच्या नातेवाईकापर्यंत पोहोचली आणि मृतकाची ओळख निश्चित करण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव राहुल हरिश्चंद्र जोशी (वय ४६) असून ते हनुमान मंदिराजवळ, जोशी लेआउट, पांढरकवडा, ता. केळापूर, जि. यवतमाळ येथील रहिवासी होते.मंगळवारी (दि. १६) दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास जळका शिवारातील साईनाथ परचाके यांच्या शेताजवळील नालीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आला.प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे, उंची सुमारे ५ फूट ८ इंच, रंग गोरा, शरीरयष्टी सडपातळ, काळे-पांढरे केस व वाढलेली दाढी अशी ओळख सांगण्यात आली होती. त्यांच्या अंगावर फिकट गुलाबी रंगाचा हाफ टी-शर्ट व राखाडी रंगाची हाफ पँट होती.

या घटनेची माहिती जळका येथील पोलीस पाटील विजय मोघे यांनी मारेगाव पोलिसांना दिली होती. अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य मागितले होते. त्यानंतर अल्पावधीतच मृतकाची ओळख पटल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

दरम्यान, राहुल जोशी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून उत्तरीय तपासणी अहवाल व पोलिस तपासानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे. त्यामुळे मृत्यूचे कारण अथवा स्वरूपाबाबत कोणताही निष्कर्ष काढणे अद्याप लवकर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सागर दानडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी बुरकुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके तसेच पोलीस कर्मचारी नामदेव भटारकर, सागर दीपेवार आणि विकास खंडारे करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर