ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

आढावा बैठकीस महावितरणचे कर्मचारी गैरहजर:आमदार किसनराव वानखेडे यांनी घेतली गंभीर दखल; कामे वेळेत करण्याची सर्वांना तंबी‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आगामी पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी उमरखेड-महागाव मतदारसंघातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आमदार किसनराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक राजे संभाजी महाराज उद्यान येथे १५ जून रोजी पार पडली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, पूरस्थिती, रस्ते, वीजपुरवठा, आरोग्य सेवा, कृषी, पशुसंवर्धन, वाहतूक या विषयांवर चर्चा झाली. असले तरी, महावितरण विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्याने त्यांना नोटीस पाठवण्याचे आदेश आमदार यांनी दिले आहेत. बैठकीला उपविभागीय महसूल अधिकारी सखाराम मुळे, कार्यकारी अभियंता सा. बा. महेश माथुरकर, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर उपस्थित होते. महसूल, पंचायत समिती, कृषी, पशुसंवर्धन, पोलीस प्रशासन, जलसंपदा, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, आरोग्य, सिंचन, नगर परिषद, वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी सहभागी झाले. आमदार वानखेडे यांनी प्रत्येक विभागाकडून मान्सूनपूर्व तयारीचा तपशील मागितला. पूरप्रवण गावांची माहिती मागितली. अतिसंवेदनशील गावांची माहिती मागितली. नियंत्रण कक्षाची कार्यवाही विचारली. बचाव व्यवस्था विचारली. स्थलांतर व्यवस्था विचारली. रस्ते, पुलांची स्थिती विचारली. धरण सुरक्षा विचारली. पूरसूचना यंत्रणा विचारली. वीजपुरवठा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले. साथीच्या आजारांवरील उपाययोजना विचारल्या. पीक विमा विषय मांडला. जनावरांच्या संरक्षणाची तयारी विचारली. बैठकीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचे निदर्शनास आले. आमदारांनी रोष व्यक्त केला. संबंधित अभियंत्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्यात नागरिकांना वीजपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी महावितरणने अधिक जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. हवामानाचा अंदाज विचारात घेऊनच धरणातून पाणी सोडा आपत्तीच्या काळात पंचनामे करताना कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामसेवक, तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी शेतीपिके, घरे व इतर नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करून दिलेल्या वेळेच्या आत अहवाल सादर करावा. आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करावी, ईसापूर धरणाच्या अधिकाऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज विचारात घेऊनच धरणातून पाणी सोडावे, पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा. पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी समन्वय साधून स्वच्छतेची कामे करून घ्यावीत. – सखाराम मुळे, उपविभागीय महसूल अधिकारी, उमरखेड.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर