ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

संवादातूनच समृद्धीचा मार्ग; आधुनिक तंत्रज्ञान वापरा:अकोल्यात शेतकरी मित्र मंडळाची वार्षिक आमसभा उत्साहात; शेतकऱ्यांना करण्यात आले तज्ज्ञांकडून मार्गदर्शन‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कास्तकारांच्या शाश्वत विकासासाठी सतत सेवारत असणाऱ्या स्थानिक ‘शेतकरी मित्र मंडळाची’ वार्षिक आमसभा नुकतीच उत्साहात पार पडली. मंडळाचे अध्यक्ष विनोद साखरकर यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विभागाच्या ‘आत्मा’ संस्थेचे संचालक शेगोकार उपस्थित होते. तर मंचावर मंडळाचे कोषाध्यक्ष संचालक शिवहरी पारस्कर व ज्येष्ठ संचालक सुरेश मुंदडा उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला मंडळाचे संचालक अरविंद देशमुख यांनी स्वागत केले. त्यानंतर सुरेश मुंदडा यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या गत १६ वर्षांतील यशस्वी प्रवासाचा व शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. संवादातून समृद्धी हे संस्थेचे ब्रीदवाक्य असून, कास्तकारांमधील सामूहिक संवाद हाच त्यांच्या प्रगतीचा खरा मार्ग आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या आमसभेत सन २०२५-२६ चा वार्षिक कामकाजाचा ताळेबंद व हिशोब संचालक सतीश देशमुख यांनी सादर केला, त्याला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या वार्षिक आमसभेला कृषी क्षेत्रातील मान्यवरांसह पूर्णाजी तरोळे, अ‍ॅड. सुहास काटे, अ‍ॅड. गजानन पाटील, बाबासाहेब महल्ले, गजानन खोटरे, अरुण पागृत, नरेंद्र देशमुख, खुर्शिद भाई, डी. गावंडे, संजय साकरकर, उमेश लगड, सेवकराम दुर्गे आणि विजय पाटील अंकुरकार आदी उपस्थित होते.मंडळाचे संचालक सुनील मोडक यांनी आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने उत्कृष्ट खरबुजाचे उत्पादन घेतल्याबद्दल, कृषी विभाग व मंडळाच्या वतीने त्यांचा सभेत जाहीर सत्कार करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर