ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

सत्यम गांधी यांच्याकडून विकासकामांचा आढावा:आरोग्य, घरकुल, पाणीपुरवठा व ग्रामविकास योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मंगळवारी दर्यापूर तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालय तसेच विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावाही घेण्यात आला. काही ठिकाणी नागरिकांसमवेत अगदी खाली बसून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी योग्य सूचना व निर्देश दिले. येवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीने या दौऱ्याचा प्रारंभ झाला. परिसरातील अस्वच्छता पाहून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील भेटीदरम्यान अशी परिस्थिती दिसता कामा नये, असे स्पष्ट निर्देश तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांना दिले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी करण्यात आली. संभाव्य मान्सून परिस्थिती लक्षात घेऊन पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णांसाठी उपलब्ध बेडशीट, उशा व ब्लँकेटची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यांच्या स्वच्छतेबाबत समाधानकारक व्यवस्था राखण्यास सांगितले. विहित प्रक्रियेनुसार नवीन साहित्य खरेदी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ऑपरेशन थिएटर, प्रसाधनगृहे व इतर आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. आवश्यक सुधारणा तातडीने करण्यास सांगितले. त्यानंतर दर्यापूरच्या पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील टप्पा-१ व टप्पा-२ मधील घरकुले पूर्ण करणे, एफटीओ एका आठवड्यात पूर्ण करणे, लाभार्थ्यांचे हप्ते कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेवू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. सांगवा ग्रामपंचायतमध्ये आढावा बैठक संपन्न त्यानंतर सांगवा ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. महिला बचत गटांच्या सदस्यांशी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांशी त्यांनी विशेष संवाद साधला. विद्यार्थ्यांना “मोठे झाल्यावर काय बनायचे आहे?” असा प्रश्न विचारला. पोलिस, अभियंता आदी होण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर