ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

आमचे खासदार फुटले नाहीत, विकले गेले:भाजपमध्ये सर्व मावशा आहेत; महाजनांच्या अनेक भानगडी.. तर तेच पहिले पक्ष सोडतील- संजय राऊत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आमच्या हातात ईडी, सीबीआय मिळू द्या भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होतील. त्यामध्ये सर्वांत आधी गिरीश महाजन पक्ष सोडतील, इतक्या त्यांच्या भानगडी आहेत. ओमराजे निंबाळकर यांना पक्षाने आमदार-खासदार केले त्यांच्यासाठी वेळ काढावा लागतो, कोर्ट काही घरात किंवा पुण्यात नाही, ओमराजेंनी आम्हाला शिकवू नये. संजय दिना पाटील हे शिवसेनेमुळेच जिंकले आहेत, त्यांना जाण्याचे काहीच कारण नव्हते, त्यांच्या मुलीला तिकीट दिले, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, शिवसेना फुटली असे मी म्हणत नाही. माणूस विचारासाठी बाहेर पडतो. कोणाला लिलावात विकत घेतले तर त्याला फुटणे नाही विकले असे म्हणावे लागेल, आमचे 6 खासदार विकले गेले. ते काही विचार घेऊन गेले नाहीत. शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर बसल्याने घडल्याचे जामनेरच्या मावशीने म्हटले आहे. भाजपमध्ये सर्व मावशा आहेत. काँग्रेसच्या मदतीनेच हे 6 लोकं सुद्धा निवडून आले. मविआत काँग्रेस आहे हे त्यांना माहिती नव्हते का? काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र मिळाले? भाजपला त्यांचा तिटकारा का आहे? हे काही बंड नाही? बंड करण्यासाठी काय 100 कोटी रुपये घेतले का? भाजपला बंड आणि क्रांती म्हणजे काय माहिती नाही. बाळासाहेबांच्या पाठीवरही वार झाले संजय राऊत म्हणाले की, शिवसेना जास्त काळ टिकणार नाही, मुंबई, ठाण्याच्या पुढे जाणार नाही असे अंदाज ज्यांनी मांडले होते ते फोल ठरले. शिवसेना दिल्लीपर्यंत पोहोचली आणि 60 वर्षे घोडदौड केली. चढउतार येतच असतात. बाळासाहेबांना सुद्धा अनेक धक्के पचवावे लागले स्वकीयांनी अनेकदा त्यांचा घात केला, पाठीवर वार झाले. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझ्या पाठीवर इतके वार झाले आहेत की आता नवे वार झेलण्यासाठी जागा नाही. त्यामुळे आज जे घडते आहे त्यांचे आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. शिवसेना संपणार नाही संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वकीयाबरोबर 200 लढाया लढाव्या लागल्या. तोच संघर्ष शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज यांचेच कार्य पुढे नेत आहे. पिसाळ आमच्याही वाट्याला आले. म्हणून काही कार्य काही थांबले नाही. आमदार आणि खासदार इतकेच शिवसेनेचे कार्य नाही. शिवसेना कधीही संपणार नाही, ती वाढतच जाणार आहे. चळवळ जे उभी करतात त्यांना गद्दारीच्या संकटातून जावे लागते. मंत्रीपदावरून वाद अन् 25 कोटींची ‘मांडवली संजय राऊत म्हणाले की, फुटलेले 6 खासदार हे महाराष्ट्रात नाही, त्यांच्यामध्ये मंत्रीपदासाठी वाद सुरू झाले आहेत. उरलेल्या 5 जणांना 25 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे अशी मांडवली काल रात्री झाली आहे. लोकं त्यांच्याविरोधात आंदोलने करत आहेत. स्वच्छ आहात तर मग पोलिस बंदोबस्त का लागतो आहे. एकीकडे राज्यात गुन्हेगारी वाढलेली असताना पोलिसांना गद्दारांच्या सुरक्षेचे काम का करावे लागत आहे. लाज वाटत असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर