ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

भाळवणीत शोले स्टाईल ड्रामा, 2 मुलाची आई प्रेमप्रकरणातून थेट चढली टॉवरवर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘प्रेम आंधळं असतं’ असं म्हणतात, पण समाज माध्यमाच्या युगात हेच प्रेम कधी कोणते वळण घेईल याचा नेम राहिलेला नाही. सांगली जिल्ह्यातील एका ३६ वर्षीय २ मुलांच्या मातेचा आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील २० वर्षीय तरुणाचा समाज माध्यमावर सुरू झालेले प्रेमप्रकरण थेट मोबाईल टॉवरवर पोहोचल्याची घटना समोर आली. गुरुवारी सकाळी भाळवणी गावात तब्बल २ तास रंगलेल्या या शोले स्टाईल ड्राम्याने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. मात्र, पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक रेखा घनवट यांनी दाखवलेले अचाट धाडस आणि संयमामुळे एक मोठा अनर्थ टळला. संबंधित ३६ वर्षीय महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. गेल्या ३-४ वर्षांपासून ती पती आणि मुलांपासून वेगळी राहत होती. दरम्यान, समाज माध्यमावर तिची ओळख भाळवणी येथील २० वर्षीय तरुणाशी झाली आणि दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. २- ३ महिने एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागल्याने महिलेने तरुणाविरोधात पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये तरुणाला अटकही झाली. काही दिवसांनी कोर्टाने तरुणाला जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतरही हे दोघे पुन्हा एकत्र राहू लागले होते. परंतु, पुन्हा काहीतरी बिनसल्याने तरुणाने “मला आता तुझ्यासोबत एकत्र राहायचे नाही,” असे स्पष्ट सांगितले. सकाळी तिने थेट गावातील एक उंच मोबाईल टॉवर गाठला आणि ती वर चढून तरुणाला बोलवण्याची मागणी करू लागली. टॉवरवर चढून बसल्यानंतर या महिलेने स्वतःच ११२ या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून पोलिसांना पाचारण केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक रेखा घनवट यांनी स्वतः कमान सांभाळली. त्यांनी जीवाची पर्वा न करता स्वतः टॉवरवर चढून त्या महिलेशी संवाद साधला, पो.नि. घनवट व त्यांच्या टीमने अत्यंत सुरक्षितपणे त्या महिलेला टॉवरवरून खाली उतरवले. या धाडसाबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पीआय घनवटची कामगिरी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर