ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

MBBS विद्यार्थ्यांकडून कथित बेकायदा फी वसुली:NHRC ने केंद्रीय शिक्षण मंत्रालय, NMC, महाराष्ट्र सरकारकडून मागवला रिपोर्ट; गंभीर मानवाधिकार उल्लंघनही समोर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाकडून एमबीबीएस विद्यार्थ्यांकडून कथितरीत्या बेकायदेशीर आणि अतिरिक्त फी वसुली करणे, विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे अडवून ठेवणे, आर्थिक व मानसिक छळ आणि नियामक संस्थांची कथित निष्क्रियता यासारख्या गंभीर आरोपोंची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC), महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. हे प्रकरण सध्या आयोगाच्या विचाराधीन आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी डॉ. दिव्यांश द्विवेदी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सादर केलेल्या तक्रारींमध्ये आरोप केला आहे की, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणे यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) नियमांचे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे आणि लागू शुल्क रचनेचे उल्लंघन करून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना पाचव्या वर्षाची कथित बेकायदेशीर फी आकारली. तक्रारीत असाही आरोप आहे की, विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे अडवून ठेवण्यात आली, आर्थिक दबाव निर्माण केला गेला आणि यामुळे विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला समावे जावे लागले. तक्रारदाराने आयोगाला हेदेखील अवगत केले की, विविध सरकारी आणि नियामक संस्थांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही, ज्यामुळे हे प्रकरण शेवटी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आणण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी आम्ही पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे संस्थाचालक, प्राचार्य आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. NHRC ने मानले गंभीर मानवाधिकार उल्लंघनाचे प्रकरण ०६ एप्रिल २०२६ रोजी पारित केलेल्या आदेशात, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने तक्रारीतील आरोपांचे परीक्षण केल्यानंतर म्हटले आहे की, प्रथमदर्शनी हे प्रकरण पीडित विद्यार्थ्यांच्या मानवाधिकारांच्या गंभीर उल्लंघनाशी संबंधित असल्याचे दिसून येते. आयोगाने विशेषतः बेकायदेशीर फी वसुली, विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडवणे, आर्थिक व मानसिक शोषण आणि नियामक संस्थांची निष्क्रियता या आरोपांना गंभीर मानले आहे. याच आधारावर आयोगाने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयायाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांना Action Taken Report – ATR सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. NMC च्या अहवालांवर NHRC चे प्रश्न दरम्यान, आयोगासमोर सादर केलेल्या अहवालांचे पुनरावलोकन करताना, NHRC ने ३० जानेवारी २०२६ रोजी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली की, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सादर केलेले अहवाल मेडिकल कॉलेजकडून विद्यार्थ्यांकडून वसूल केलेल्या कथित बेकायदेशीर आणि अतिरिक्त फीच्या मुद्द्यावर मौन होते. आयोगाने यावर गंभीर चिंता व्यक्त करत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून खालील मुद्द्यांवर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत: रिफंड, नुकसानभरपाई आणि जबाबदारीचा प्रश्न उपजीविका आणि प्रतिष्ठेच्या अधिकाराचा मुद्दा आयोगाच्या अभिलेखानुसार, तक्रारदाराने उपजीविका, शिक्षण आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या उल्लंघनाचा प्रश्न उपस्थित केला आहे. तक्रारीनुसार, प्रशासकीय आणि नियामक निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक आघात, आर्थिक नुकसान आणि व्यावसायिक संधींमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. सध्याची स्थिती NHRC च्या एम-६ (M-6) अनुभागाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, महाराष्ट्र सरकार आणि इतर संबंधित प्राधिकरणांकडून अहवाल प्राप्त झाले असून सध्या आयोगाद्वारे त्यांचे परीक्षण केले जात आहे. या प्रकरणाशी संबंधित पत्राचाराच्या प्रतिलिपी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मानवाधिकार कक्ष आणि अंतर्गत सुरक्षा प्रभाग-II (IS-II Division) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता आयोगासमोर मुख्य प्रश्न कथित बेकायदेशीर फी वसुली, प्रभावित विद्यार्थ्यांना दिलासा, फी परतावा, संभाव्य नुकसानभरपाई, प्रशासकीय जबाबदारी आणि मानवाधिकार उल्लंघनाची चौकशी याशी संबंधित आहेत. अहवालांच्या परीक्षणानंतर आयोग पुढील कारवाई करणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर