ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

नांदेड विधान परिषदेत भाजपचे अमरनाथ राजुरकर विजयी:भाजपला 339, मविला 84 मते; काँग्रेसची मते फुटली

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नांदेड विधान परिषदेसाठी आज मतमोजणी करण्यात आली ४५२ पैकी ४५१ मतदान झाले होते . पैकी ३३९ मते घेत भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना ८४ मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीच्या प्रशांत इंगोले यांना ५ मते मिळाले आहेत. पहिल्यांदाच विधान परिषदेच्या निवडणुकीत तब्बल २३ मते बाद ठरली आहेत. नांदेड विधान परिषदेची निवडणूक प्रारंभीच्या काळात अत्यंत अटीतटीची होईल असे वाटले होते. मात्र माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या नेतृत्वाची कस लावत महायुती मधील सर्वच घटक पक्षांना एकत्र खेचून आणण्यात यश मिळवले . एवढेच नाही तर मराठवाडा जनता विकास पार्टीच्या नगरसेवकांनाही महायुतीसाठी तयार केले. महायुतीची परेड जड होत असताना काँग्रेसने अचानक आपली उमेदवारी मागे घेतली. अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील अष्टीकर यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले. तर दुसरीकडे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडचिट्टी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडली. या फुटीचा फटका विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. काँग्रेसकडे स्वतःची ९२ मते असताना कृष्णा आष्टीकर यांना केवळ ८४ मध्ये मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे स्वतःची १९ मते होती. त्यामुळे काँग्रेसची उर्वरित मध्ये गेली कुठे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला उघड उघड पाठबळ दिल्याची चर्चा होत आहे. वंचित बहुजन आघाडीने मात्र आपले ईमान कायम राखले असून एकही मतदार वंचित बहुजन आघाडीने फुटू दिला नाही. पाच पैकी पाचही मतदारांनी वंचितांच्या मागे आपली ताकद उभी केली हे आंबेडकरी चळवळीचे मोठे यश म्हणावे लागेल. तब्बल २३ मध्ये ठरली बाद नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत ४५२ पैकी ४५१ मध्ये झाली होती. मुदखेड नगरपरिषदेतील एका महिला नगरसेविकेला मतदानापासून वंचित राहावे लागले होते. आज झालेल्या मतमोजणी मध्ये तब्बल २३ मते बाद ठरली आहेत . नांदेड विधान परिषदेत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात मध्ये बाद ठरण्याचा इतिहास घडला आहे . ही मते नेमके कोणत्या राजकीय पक्षाची होती याबाबत आता तर्क वितर्क लढवले जात आहेत अखेर नांदेडची काँग्रेस फुटली खासदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संभ्रमात्मक भूमिका आणि नूतन जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांना नेतृत्वाची न बसवता आलेली घडी, महाविकास आघाडी कडून देण्यात आलेला असक्षम अपक्ष उमेदवार , ऐनवेळी विधानपरिषदेच्या निवडणुकीतून घेतलेली माघार या सर्व गोष्टींचा फटका काँग्रेसला बसला असून विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची एक ना दोन तब्बल २७ मते फुटल्याची चर्चा आहे. ही २७ मतं भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात पडली असून ते २७ नगरसेवक कोण याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत अमरनाथ राजूकरांनी रचला इतिहास नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा इतिहास माजी आमदार तथा नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य अमरनाथ राजुरकर यांनी रचला आहे . मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सलग तीन वेळा अमरनाथ राजूरकर विधान परिषदेवर विजयी झाले आहेत

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर