ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

प्रतिकुटुंब 2500 खर्चून गावात खोदली बोअरवेल:मेळघाटातील बोरधाच्या 110 कुटुंबांचा पुढाकार, आठवडाभरात गोळा केले 2.75 लाख‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गावात पिण्याचे पाणी नाही, अन् मागणी करुनही सरकार लक्ष देत नाही, अशी स्थिती असताना मेळघाटातील बोरधा (ता. चिखलदरा) गावच्या रहिवाशांनी प्रशासकीय अनास्थेच्या डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण वास्तवात उतरवले. या गावातील ११० कुुटुंबांनी प्रत्येकी अडीच हजार याप्रमाणे २ लाख ७५ हजार गोळा करुन बोअरवेल तयार केली. बोरधाची लोकसंख्या ५५० आहे. या गावाची गट ग्रामपंचायत राहू आहे. बोअरवेल करण्यासाठी येथे बैठक घेतली नाही. गावातील चार-पाच तरुणांनी रात्री एकत्र बसून, या समस्ये विषयी चर्चा केली. वेगवेगळे उपाय शोधताना त्यांनी बोअरवेलच्या पर्यायावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या दिवशी त्यासाठीचा एकूण खर्च संबंधित खासगी यंत्रणेकडून मागवला आणि ही माहिती प्रत्येक घरी पोहोचवली. विशेष असे की गावातील प्रत्येक कुटुंबाने या तरुणांच्या प्रस्तावावर विश्वास दर्शवून रक्कम गोळा करण्यासाठी मदत केली. आठ दिवसांत पैसेही गोळा झाले. गावात पाणी कुठे लागेल,याचा शोध घेण्यासाठी पुढे मध्यप्रदेश येथील एका कंपनीची मदत घेतली गेली. गावात आणून ठेवलेल्या कृत्रिम पाण्याच्या टाकीजवळ हॅण्डपंप आहे. परंतु त्यात पाणी येत नाही. म्हणजेच ती जागा सोडून गावातील दुसऱ्या जागेचा शोध घेतला. बोअर करताना तब्बल साडे सहाशे फूट खोल खड्डा करावा लागला. तेथे पाण्याचा स्त्रोत असल्याचे बोअर वाल्याकडून सांगण्यात आले. मुळात गावकऱ्यांनी गोळा केलेल्या रकमेत हे होणे शक्य नव्हते. त्यामुळे अतिरिक्त शंभर फूट पाइपचे पैसे वेगळे लागतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यातून मध्यम मार्ग काढत खालच्या शंभर फुटाचे केसींग (प्लॉस्टीक पाइपचे आवरण) थांबवण्यात आले. परिणामी पाणी थोडे कमी दाबाने प्राप्त होत आहे. पण गाववासी या प्रयोगावर खूष आहेत. कारण पूर्वी पाणी आणण्याकरिता गावाच्या बाहेर एक ते दीड किलोमीटर अंतरावर जावे लागत होते. पाण्यासाठी यांनी घेतला पुढाकार बोअरवेलसाठी पुढाकार घेतलेल्यांमध्ये मुंगा धिकार, सोमा कासदेकर, चंदू धिकार, डाबली धिकार, राजेश कासदेकर, झुले धिकार, प्रतिराम चिमोटे, नंदराम धिकार, रेखा कासदेकर, प्रमिला कासदेकर, टुमली धिकार, शांती कासदेकर व इतरांचा समावेश आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर