ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

डोळ्यात मिरची पूड फेकली अन् तरुणावर चाकूने हल्ला करुन खून:लग्नात नातेवाइकांसमोर ‎मारहाण केल्याचा काढला वचपा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने हल्ला चढवत हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी २० रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास बडनेरा येथे भगतसिंग चौकात घडली. या प्रकरणी मृतकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर काही तासांतच या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. याचवेळी एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले. ओम आशिष कैथवास (२३, रा. माताफैल, जुनी वस्ती, बडनेरा) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तर रोशन धनराज कैथवास (१९, रा. भगतसिंग चौक, जुनी वस्ती, बडनेरा) व संकेत विनोद कैथवास (२०, रा. माताफैल, जुनी वस्ती, बडनेरा) अशी अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री ओम कैथवास हा दुचाकीने भगतसिंग चौकातून जात होता. लग्नात नातेवाइकांसमोर मारहाण केल्याचा काढला वचपा मारेकरी व मृतक तरुण हे दोघेही एकमेकांच्या नात्यात आहे. सुमारे आठ ते दहा महिन्यांपुर्वी एका लग्नात डिजे वाजवण्याच्या कारणावरुन ओम व रोषण, संकेत यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी लग्नातील नातेवाईकांसमक्ष ओमने आपल्याला मारहाण केली होती, असे संकेत व रोषणने सांगितले असून त्याच वादाचा वचपा काढण्यासाठी खून केल्याचे ते सांगत असल्याची माहीती बडनेराचे ठाणेदार हनुमंत उरलागोंडावर यांनी दिली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर