ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

ठाकरेंची सत्ता आली मुंबईचे मोहम्मद लँड होईल:नीतेश राणेंची ठाकरे बंधूंवर जहरी टीका; मुंबईचे नाव बॉम्बे होणार असल्याचा दावा फेटाळला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपचे नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी मुंबईत महायुतीची सत्ता आली तर मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे होईल हा उद्धव ठाकरे यांचा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. मुंबईत महायुतीची सत्ता आलाल्यानंतर मुंबईचे नामकरण बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरेंची सत्ता आली तर मात्र मुंबईचे मोहम्मद लँड जरूर होईल, असे ते म्हणालेत. नीतेश राणे यांच्या या टीकेमुळे मुंबईतील राजकारण चांगलेच तापले आहे. खासदार संजय राऊत व अभिनेते महेश मांजरेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक संयुक्त मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर मुंबईचे नाव बॉम्बे करण्याचा आरोप केला होता. मुंबईतील मराठी माणसांचे हित व मराठी अस्मितेच्या मुद्यावर प्रचार केंद्रित करून महायुती सत्तेत आल्यास मुंबईचे अस्तित्वच धोक्यात येईल. महायुती मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे असे करेल, असे ते म्हणाले होते. मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी त्यांचा हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला. मुंबईचे मोहम्मद लँड होईल – नीतेश राणे उद्धव मामु बोलतात की, महायुती सत्तेत आली तर मुंबईचे परत बॉम्बे करून टाकतील. हे तर शक्यच नाही. पण उद्धव मामु सत्तेत आले तर मुंबईचे मोहम्मद लँड नक्कीच करून टाकतील, असे नीतेश राणे शुक्रवारी आपल्या एका ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवत म्हणाले. उद्धव ठाकरेंमुळे मुंबईत बांगलादेशी, रोहिंगे वाढले नीतेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वेगळी होती आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना वेगळी आहे. मराठी माणूस, हिंदू समाजाला मुंबईत सुरक्षित ठेवण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. पण त्यांच्यानंतर पुढच्या पिढीने नेमका विरोधाभास केला. पूर्वी शिवसेना आहे म्हणून मुंबई आहे असे म्हटले जात होते. पण आता उद्धव ठाकरे आहेत म्हणून बांगलादेशी व रोहिंगे आहेत असे नवे समीकरण तयार झाले आहे. टिस्सच्या अहवालानुसार उद्धव ठाकरे यांचे राज्य असलेल्या मुंबईत बांगलादेशी व रोहिंगे वाडत चालले आहेत. 2030 पर्यंत हा टक्का अधिकच वाढण्याची भिती आहे, असे नीतेश राणे म्हणाले आहेत. आत्ता पाहू काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत भाजपचा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही, पण आज मुंबईची संस्कृती मारली जात आहे. कुणीही येते आणि सांगत की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे. आमच्यावर हिंदी सक्ती करणार, आमची अस्मिता, संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवणार तर या गोष्टीला काही अर्थ नाही. बस म्हटले की बस आणि उठ म्हटले की उठ म्हणणारी ही लोक आहेत. त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा?, असे ते भाजपच्या राज्यातील नेत्यांवर निशाणा साधताना म्हणाले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर