ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मेळघाटच्या गिधाडाने 27 दिवसांत 3,334 किमी प्रवास केला:राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मेळघाटच्या जंगलातून उड्डाण घेतलेल्या एका गिधाडाने राजस्थानपर्यंतचा प्रवास करून वन्यजीव क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘एक्स-67’ क्रमांकाच्या या 5 वर्षीय मादी भारतीय गिधाडाने अवघ्या 27 दिवसांत तब्बल 3,334 किलोमीटरचे अंतर पार केले. हे गिधाड नुकतेच राजस्थानमधील प्रसिद्ध रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले. या गिधाडाचा जन्म कृत्रिम पैदास केंद्रात झाला होता. 2 जानेवारी 2026 रोजी तिला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागातून निसर्गात सोडण्यात आले. सुरुवातीचे चार महिने तिने मेळघाटच्या परिसरात राहून नैसर्गिक वातावरणाचा सराव केला. त्यानंतर 28 मे रोजी तिने मेळघाट सोडले आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश व राजस्थान या तीन राज्यांतून प्रवास केला. या प्रवासादरम्यान तिने सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि चित्त्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुनो नॅशनल पार्कलाही भेट दिली. बॉम्बे नॅशनल हिस्टरी सोसायटीचे (BNHS) संचालक किशोर रिठे यांनी या घटनेचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, या गिधाडाने कोणत्याही मानवी मदतीशिवाय जंगलात स्वतःचे अन्न शोधून स्वतःला जिवंत ठेवले. यामुळे कृत्रिम पैदास केंद्रातील गिधाडेही निसर्गात यशस्वीपणे जगू शकतात, हे सिद्ध झाले आहे. तसेच, या गिधाडाने प्रवासासाठी केवळ व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित जंगलांचा मार्ग निवडला, कारण अशा ठिकाणी वाघ-बिबट्यांच्या शिकारीमुळे त्यांना सहजपणे अन्न उपलब्ध होते. या गिधाडांच्या पाठीवर सौरऊर्जेवर चालणारे आधुनिक टॅग आणि पायात निळ्या रंगाची रिंग लावण्यात आली आहे. या उपकरणांच्या मदतीने बीएनएसचे शास्त्रज्ञ त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. भारताच्या गिधाड संवर्धन कार्यक्रमासाठी हा प्रवास एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर