ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हर्षवर्धन सपकाळांमुळे भाजपच्या बुडाला आग:ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा घणाघात; राहुल नार्वेकर यांच्या VIDEO कडे वेधले लक्ष

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपने टिपू सुलतानच्या मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात छेडलेल्या आंदोलनाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम एकमेवाद्वितीय आहे याविषयी दुमत नाही. पण हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दादागिरीचा व्हिडिओ शेअर केल्याने भाजपच्या बुडाला आग लागली आहे. या प्रकरणावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भाजपला ही सगळी नौटंकी करावी लागत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आणणे भाजपचा जुना फंडा:हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार; भाजपच्या जाहिरनाम्यात ‘टिपू’चा फोटो असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितपणे टिपू सुलतान यांची तुलना कथितपणे छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. भाजपने या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी काँग्रेसची बाजू घेत भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे. मुलुंड येथील मेट्रो स्लॅबची दुर्घटना व राहुल नार्वेकरांच्या व्हिडिओवरून लक्ष हटवण्यासाठी भाजप टिपू सुलतानच्या मुद्यावर हेतुपुरस्सर आंदोलन करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचा पराक्रम एकमेव द्वितीय आहे. याबद्दल दुमतच नाही . पण काल मुलुंडला झालेल्या मेट्रो स्लॅबच्या दुर्घटनेला झाकण्यासाठी आणि राहुल नार्वेकरांचा दादागिरी करतानाचा व्हिडिओ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब यांनी शेअर केल्याने भाजपच्या बुडाला आग लागलेली आहे. एकाच वेळी मेट्रो दुर्घटना आणि नार्वेकर या दोन्ही बातम्यांवरील जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भाजपाला ही सगळी नौटंकी करावी लागत आहे. भाजपने सगळी गुंडागर्दी कोरटकरसाठी राखीव ठेवली असती भाजप कार्यकर्त्यांच्या मनात खरंच जर छत्रपती शिवरायांच्या बद्दल एवढं प्रेम, आपुलकी आणि आदर असता तर त्यांनी आज जे पुण्यात आंदोलन केलं हे आंदोलन त्यांनी खूप आधी भगतसिंह कोश्यारींच्या समोर राज्यपाल भवनला केले असते. ही सगळी जी तोडफोड आहे किंवा आत्ताची जी सगळी गुंडागर्दी आहे ती कदाचित प्रशांत कोरटकरसाठी त्यांनी राखीव ठेवली असती. ज्या भाजपच्या नेते म्हणवणाऱ्या फडणविसांनी छत्रपती शिवरायांच्या अवमानाबद्दल सभागृहात साधा निंदा व्यंजक ठराव मांडला नाही त्यांना खरेच आज नौटंकी करण्याचा नैतिक अधिकार आहे का? मेट्रो दुर्घटना आणि कालचे राहुल नार्वेकरांचे प्रताप झाकण्यासाठी भाजप आत्ता हा सो कॉल्ड ड्रामा उभा करत आहे. कुठलेही विकास काम आम्हीच केलं असं म्हणून क्रेडिट घ्यायला पुढे येणारे फडणवीस कालच्या दुर्घटनेनंतर साधं ट्विट ही करायला पुढे आले नाहीत, त्यावर आधी भाजपच्या गल्लाभरू प्रवकत्यांनी उत्तरे दिली पाहिजेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. येड्याची जत्रा पेढ्याचा पाऊस सुषमा अंधारे यांनी अन्य एका पोस्टद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी येड्याची जत्रा पेढ्याचा पाऊस हा हॅशटॅग वापरला आहे. अरे हे किती गुणी आणि कर्तव्यदक्ष लोक आहेत. मुंबईच्या महापौर रीतू तावडे गृहमंत्री फडणवीस यांची कामे करत आहेत. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महसूल खात्याची कामे करत आहेत. तेसुद्धा शेतकरी घरात नसताना. नार्वेकर आणि रितू तावडे यांची कर्तव्यदक्षता बघितली तर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे लोक अगदीच निरुपयोगी ठरतात. असं असेल तर मग यांची खाती काढून या दोघांनाच द्यायला हवीत, असे अंधारे यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे. हे ही वाचा… पुण्यात भाजप – काँग्रेसच्या आंदोलनात दगडफेक:2 कार्यकर्त्यांसह पोलिस अन् पत्रकारही जखमी; महापौरांच्या हजेरीत हल्ला – काँग्रेस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. येथे भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यात काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी स्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर