ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जिल्ह्यात 24 तास आपत्कालीन नियंत्रण‎कक्ष:वैद्यकीय अधिकारी, नर्सेस अलर्टवर‎, पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थिती, साथरोगांचा सामना करण्यासाठी तयारी सुरू‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला असून तालुका पातळीवरील आरोग्य अधिकाऱ्यांना व्यापक पूर्वतयारीच्या सूचना दिल्या आहेत. सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक गावात नियमित घरभेटी व दैनंदिन सर्वेक्षणाचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. आरोग्य विभागाकडून आगामी पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थिती आणि साथरोगांचा सामना करण्यासाठी तयारी सुरू आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शक परिपत्रक जारी करून आवश्यक उपाययोजनांचे आदेश दिले. २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी १५ जून २०२६ पासून सर्व तालुक्यांमध्ये २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एक तांत्रिक कर्मचारी व परिचर नियुक्त केला जाईल. पूरपरिस्थिती रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पर्यायी मनुष्यबळाची व्यवस्था केल्याशिवाय मुख्यालय न सोडण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष वैद्यकीय पथके तैनात आणि औषध साठा उपलब्ध ^पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला . डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी गप्पी माशांचा वापर, कीटकनाशक फवारणी आणि घराघरांमध्ये दैनंदिन सर्वेक्षण केले जाईल. विस्थापित कुटुंबांच्या छावण्यांमध्ये दररोज आरोग्य तपासणी करून महिलांना सॅनिटरी पॅड्सचे वाटप केले जाईल. नागरिकांनी दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी काळजी घ्यावी. डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गर्भवती व आजारी व्यक्तींची सुरक्षा, राहण्याची व जेवणाची मोफत सोय पूरबाधित गावांमधील प्रसूतीची तारीख जवळ आलेल्या गर्भवती मातांना ८ दिवस आधीच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून घेतले जाईल, तसेच त्यांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाईल. गंभीर आजारी, दिव्यांग व्यक्ती आणि दुर्धर मुले यांचीही यादी अद्ययावत करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.ज्यामध्ये आरोग्य सेवक आणि आशा स्वयंसेविकांचा समावेश असेल. पूरग्रस्त गावांमध्ये २४ तास कार्यरत राहतील अशी विशेष वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत, ज्यामध्ये डॉक्टर, आरोग्य सेवक आणि आशा स्वयंसेविकांचा समावेश असेल. दुर्गम व संपर्क तुटणाऱ्या भागात किमान ३ महिने पुरेल एवढा औषधांचा साठा पावसाळ्यापूर्वीच उपलब्ध केला जाईल. तसेच सर्पदंश आणि श्वानदंशावरील लसींचा पुरेसा साठा ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्र Share with facebook

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर