ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मोहाळ ते उंडणगाव बससेवा सुरू:चालक-वाहकांचा सत्कारः शिक्षणाचा प्रवास सुलभ, ग्रामस्थांनी मानले मंडळाचे आभार‎

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मोहाळ येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास आता अधिक सोयीस्कर झाला असून, विद्यार्थ्यांसाठी मोहाळ ते उंडणगाव अशी एस.टी. बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेमुळे सावित्रीबाई फुले कन्या हायस्कूल, उंडणगाव येथे शिक्षण घेणाऱ्या १०० ते ३०० विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोहाळ येथील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी उंडणगाव येथे ५ किलोमीटर ये-जा करतात. विद्यार्थ्यांना सुरक्षित व नियमित वाहतूक सुविधा मिळावी, तसेच शासनाच्या विद्यार्थी सवलत योजनांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे बसची मागणी करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन बस सुरु करण्यात आली आहे. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. आता मुलींसाठी शासनाने सुरू केलेल्या अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजनेचा तसेच मुलांसाठीच्या सवलतीच्या पास योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उपक्रमामुळे पालकांची आर्थिक व वाहतुकीची चिंता कमी होणार आहे. बस सेवेच्या पहिल्या दिवशी मोहाळ येथे चालक व वाहक यांचा पालकांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दिगंबर संपत दोंगे, देविदास हरिबा सौंदर, तुकाराम श्रीपत जवखेडे, मुख्याध्यापक अनिल लांडगे, शिक्षक संजय लांडगे, संदीप कुमावत, अशोक साळवे, विजय सपकाळ, राजेश चव्हाण, संतोष राकडे, लक्ष्मण मोकासे विद्यार्थी व पालक उपस्थित होते. बससेवेचे परिसरातील ग्रामस्थांकडून स्वागत विद्यार्थ्यांसाठी मोहाळ ते उंडणगाव अशी एस.टी. बससेवा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू झालेल्या या बससेवेचे परिसरातून स्वागत होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बस सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी एसटी महामंडळाचे आभार मानले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर