ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

चारनेर येथे अवैधरीत्या पाणी उपसा:महसूल, ग्रामपंचायत प्रशासनाच्या पथकाची कारवाई, भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चारनेर धरणातून अवैधरीत्या पाण्याचा उपसा करणाऱ्यांविरुद्ध महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाई करत इलेक्ट्रिक पंप, वीज केबल व पाइप जप्त केले. जप्त करण्यात आलेले साहित्य आमठाणा ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आले असून या कारवाईमुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. चारनेर धरण हे परिसरातील प्रमुख जलस्रोत असून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही या धरणातील पाणीसाठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. मात्र, काही व्यक्तींकडून धरणातील पाण्याचा नियमबाह्य पद्धतीने इलेक्ट्रिक पंपाच्या सहाय्याने उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी धरणाच्या काठावरून मोठ्या अंतरापर्यंत टाकण्यात आलेले पाईप, वीजपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केबल तसेच इलेक्ट्रिक पंप आढळून आले. तत्काळ कारवाई करत संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी ते आमठाणा ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्यात आले. ही कारवाई ग्रामविकास अधिकारी बन्सीधर पडूळकर, तलाठी विशाल पाटील, तसेच ग्रामपंचायत आमठाणा येथील कर्मचाऱ्यांनी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारच्या अवैध पाणी उपशाला कोणतीही मुभा दिली जाणार नसून भविष्यातही अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर