ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पार्थ पवारांना खासदार करू नका, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा:अंजली दमानिया यांची सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा दाखला देत मागणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुणे भूखंड घोटाळ्याप्रकरणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसांत शपथविधी घ्यायला हरकत नसेल, तर पुणे भूखंड घोटाळ्याची चौकशीही थांबवायची नाही, असे त्या म्हणाल्यात. धनंजय मुंडेंसारखा संधीसाधू माणूस सुनेत्रा पवारांच्या मागेपुढे फिरताना दिसल्याची बाबही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गत बुधवारी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसांतच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. या प्रकरणी सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही प्रकारच्या चर्चा होताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्या रविवारी एका पोस्टमध्ये म्हणाल्या, अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या ३ दिवसांत शपथविधी घ्यायला काहीच हरकत नसेल आणि “बिझनेस अज यूज्युअल” असेल, तर पुणे जमीन घोटाळ्याची चौकशीही थांबवायची नाही. 1. पार्थ पवारांविरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करा.
2. खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करा. पार्थ पवारांवर चौकशी सुरू असताना राज्यसभेचे खासदार बनवणे चुकीचे आहे, असे त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवारांमागे धनंजय मुंडेंसारखे संधीसाधू अंजली दमानिया यांनी यावेळी सुनेत्रा पवारांच्या मागे संधीसाधू नेते मागेपुढे करत असल्याचाही आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडेंही सुनेत्रा पवारांच्या पुढे मागे फिरताना दिसले. संधीसाधू माणूस. परत येण्याची तडफड दिसतेय, असे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवारांवर भूखंड घोटाळ्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील मुंढवा – कोरेगाव पार्क परिसरातील 1800 कोटींचा भूखंड अवघ्या 300 कोटींत खरेदी केल्याचा आरोप आहे. ही जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया यांच्या कंपनीने खरेदी केली होती. या प्रकरणी शितल तेजवानी व दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. पण आता अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाला हात घातला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर