ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

महापालिकेला मिळाले 129 कोटी तरी शहरातील विकासकामे ठप्पच:ज्या कामासाठी निधी मिळाला त्यासाठीच वापरण्यावर प्रशासन ठाम‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महानगरपालिकेला मागील काही महिन्यांमध्ये विविध शासकीय योजनांचा सुमारे १२९ कोटी रु.चा निधी मिळाला आहे. त्यानंतर वार्ड व प्रभागातील विकासकामे ठप्प आहेत. अगदी आवश्यक लहान पुल रखडले आहेत. चर्चा केवळ कचऱ्याचीच होत आहे. कचऱ्यासाठी सर्वत्र ओरड सुरू आहे. इतर विकासकामांकडे कोणाचेही लक्ष नाही. नगरसेवकांना वार्ड विकास व स्वेच्छा निधी पूर्णपणे मिळाला नसल्याने कामांना अजूनही सुरुवात झाली नाही. मागील सात वर्षांपासून शहराच्या विविध प्रभागातील आवश्यक, परंतु लहान कामे मार्गी लागली नाहीत. कारण, मनपा प्रशासनाच्या हाती संपूर्ण कारभार होता. आता नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे साहजिकच नागरिकांना आपल्या प्रभागात रखडलेली किमान लहान कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. तरीही अद्याप ही कामे अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक लागले नाहीत. अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण रखडले आहे. अनेक ठिकाणी नाल्याही तयार झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त आहेत. निधी मिळावा यासाठी नुकतीच महापौर, उपमहापौर, पक्षनेते आणि स्थायी समिती सभापतींनी आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी वार्ड विकासाकरिता १० कोटी रुपयांची मागणी केली. परंतु, प्रशासनाने कोणतेही सहकार्य केले नाही. भाजप नेते चेतन गावंडे यांनीही नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधी मिळायला हवा, असे म्हटले. तो वार्ड विकास निधीच्या रूपात वितरित करण्यात यावा, अशीही मागणी केली. त्याचवेळी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी १५ व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीतून विकासाकरिता रक्कम देणे शक्य नाही, असे सांगितले. कारण, आधी सुमारे ३१ कोटी रुपयांच्या ओव्हरड्राफ्टचे समायोजन करावे लागेल. असे असले तरी मनपा प्रशासन काही प्रमाणात नगरसेवकांना दिलासा देण्याचा विचार करीत आहे. शहरी नविनीकरण योजनेसाठी २० कोटी, बाळासाहेब ठाकरे शहरी दवाखाने योजना ५ कोटी, १५ वा वित्त आयोग निधी १५.८४ कोटी, अन्य आवश्यक योजनांसाठी ८८.२० कोटी, एकूण १२९ कोटी रु. निधी मिळाला आहे. लहान पुल रखडले, केवळ कचऱ्यावरच होयेत चर्चा सध्या शहरात केवळ कचऱ्यावर चर्चा होत आहे. नगरसेवक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शहरात केवळ कचऱ्याचीच समस्या आहे. इतर सर्व समस्यांचे निराकरण झाले आहे, अशीच एकूण स्थिती आहे. लहान नाल्यांवरील पुलांची कामे रखडली आहेत. श्वानांचे निर्बिजीकरण ठप्प आहे. मोकाट जनावरे रस्त्यांवर उभी राहतात. पथदिवे, पेव्हिंग ब्लॉक्स, अंतर्गत रस्त्यांची दयनीय स्थिती, उद्यानांची दुर्दशा, समाजमंदिरांचे रखडलेले काम, नाल्यांचे अपूर्ण काम अशी अनेक कामे सध्या ठप्प आहेत. शहरात नव्याने वसलेल्या परिसरातील अंतर्गत भागात तर कचराही स्वच्छ होत नाही. केवळ घंटागाडी एक ते दोन आठवड्यांतून एकदा येऊन कचरा घेऊन जाते. या समस्यांकडेही लक्ष देणे मनपा प्रशासनासह नगरसेवकांची जबाबदारी असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. सर्व नगरसेवकांची किमान १० कोटींची मागणी वार्ड, प्रभागातील विकासकामे अपूर्ण असल्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांना एकूण १० कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवकांच्या वतीने महापौर श्रीचंद तेजवानी यांनी मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडे केली होती. परंतु, अद्याप ती पूर्ण झाली नाही. कारण, शासकीय निधी त्याच उद्देशासाठी खर्च करता येतो, ज्यासाठी तो मंजूर करण्यात आला आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर