ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.

85 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सरपंच्याची जनतेमधून निवड.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव :- जानेवारी 2021,मे 2022,तसेच जून 2022,सप्टेंबर 2022 मध्ये मुदत सपणाऱ्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 24 ऑगस्ट पासून 1सप्टेंबर पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारी दाखल करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

मारेगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीचा कालावधी मागील वर्षीच्या जानेवारी 2021ला सपुष्टात आला आहे. मात्र कधी थेट सरपंच तर कधी ओबीसी आरक्षण अशा विविध कारनाखाली मुदत संपूनही प्रदीर्घ कालावधीसाठी निवडूक कार्यक्रम प्रलंबित ठेवण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार प्रशासकाच्या भरवशावर चालत असताना विकास कामात प्रचंड समस्या निर्माण झाल्या होत्या. निवडणुक आयोगाच्या नव्या धोरणानुसार येत्या 24 ऑगस्ट पासून निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

2 सप्टेंबरच्या सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशपत्राची छाननी करण्यात येणार असून 6 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची तारीख व वेळ निश्चित करण्यात आली आहे.याच दिवशी दुपारी 3 वाजे पासून निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.18 सप्टेंबर सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदाना ची तारीख असून दुसऱ्याच दिवशी 19 सप्टेंबर मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे.

तालुक्यात होऊ घातलेल्या एकूण 11 ग्रामपंचायत या निवडणूक कार्यक्रमात समाविष्ट असून यामध्ये मच्छीद्रा, ‘डोल डोंगरगाव,सराटी, कान्हाळगाव (मा),गोधणी (केगांव), अर्जुनी, सगणापूर, खंडणी, वागदरा, जळका वरूड इत्यादी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात जनतेमधून सरपंच थेट निवडून दयावयाचा असल्याने गाव पुढऱ्याना मोठी फिल्डिंग लावावी लागणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर