ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

बीड हादरलं! घरात घुसून 17 वर्षाच्या मुलीवर…, परळीच्या तरुणाचं भयंकर कृत्य, पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी…

7 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड: अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या युवकाने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे परळी परिसरात एकच खळबळ उडाली. घरात घुसून 17 वर्षीय मुलीवर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध ‘बीएनएस’ तसेच ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र पोलिसांच्या ताब्यात येण्यापूर्वीच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

26 जुलै रोजी दुपारच्या सुमारास परळी तालुक्यातील एका गावात ही गंभीर घटना घडली होती. शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरात आरोपी घुसला आणि तिच्याशी बोलण्याच्या कारणावरून वाद घालत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विळ्याने वार करून तिला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.

Beed: बाप भांडण सोडायला आला अन् पोरानं जन्मदात्याच्या डोक्यात घातली वीट, जागेवरच गेला जीव, बीड हादरलं

मुलीवर हल्ला करून तरुण फरार

जखमी मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता आणि त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथकाचीही मदत घेतली होती.

आरोपी तरुणानं स्वत:लाच संपवलं

मंगळवारी सकाळी परळी शहरातील अंबाजोगाई रोडवरील शासकीय महाविद्यालयाच्या पाठीमागील डोंगर परिसरात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परळी शहर आणि परळी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास पिंक पथकाकडे सोपविण्यात आला होता. मात्र आरोपीचा शोध पूर्ण होण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केल्याने तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. संबंधित युवकाने आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुलीवर झालेल्या हल्ल्याचे नेमके कारण आणि या प्रकरणातील इतर बाबींचा तपास परळी शहर पोलिसांकडून पुढे सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर