ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

सोया गोल्ड शेतकरी उत्पादक कंपनीकडून ड्रोन द्वारे फवारणी ,इफको कंपनीचा उपक्रम

1.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुक्यातील खापरी येथे पहिल्यांदाच ड्रोन द्वारे  फवारणी

शेतकरी अनिल महाकुलकर यांचे शेतात केला पहिला प्रयोग

सुरेश पाचभाई मारेगाव,

तालुक्यातील छोटेसे गाव असलेल्या खापरी येथील शेतकरी अनिल स्वानंद महाकुलकर यांचे शेतामध्ये काल दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोज मंगळवारला सकाळी अकरा वाजता ड्रोन द्वारे फवारणी करण्यात आली.

नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर वाढावा तसेच पर्यावरणास हानिकारक रासायनिक खतांचा वापर कमी करणे हा ड्रोन द्वारे फवारणीचा उद्देश आहे. तसेच तालुक्यात होणाऱ्या फवारणी मधून विषबाधा रोखण्यासाठी अगदी 7 ते 10 मिनिटामध्ये 10 लिटर पाणी मध्ये एक एकर फवरणी करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या वेळेची ,पाण्याची आणि पैशाची बचत होत आहे.

फवारणी करतेवेळी गावातील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने  बघण्यासाठी उपस्थित होते. ड्रोन हे शेतकऱ्यांसाठी अगदी कमी वेळात व कमी खर्चामध्ये कपाशी व इतर पिकावर फवारणी करण्यासाठी उपयुक्त असून सोया गोल्ड शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत इफको कंपनीकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 300 रुपये एकर प्रमाणे फवारणी चार्ज घेतल्या जात आहे. नॅनो युरिया किंवा नॅनो डीएपी फवारणी करणे आवश्यक व अवघ्या काही वेळात एक एकर फवारणी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा काल  खापरी येथे ड्रोन द्वारे फवारणी करण्याचा पहिल्यांदाच शेतकऱ्यांना प्रॅक्टिकल डेमो बघायला मिळाला आहे.त्यामुळे आजूबाचे शेतकरी व बुरांडा येथील शेतकऱ्यांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी सोया गोल्ड कंपनीकडून नमो ड्रोन पायलट शामल राऊत, विकास सोनटक्के हजर होते.शेतकऱ्यांमध्ये गुलाब काळे, भारत वासेकर, शत्रुघ्न आत्राम, अनिल महाकुलकर, ऋषी मोहितकर यांचे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर