ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जबरी चोरी प्रकरणी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

82 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी जबरी चोरी प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी झरी बी.एस.वाढई यांनी आरोपी नामे दत्ता सुरेश लिंगरवार वय ३५ वर्षे रा.सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ यास दोन वर्षे २०००/- रुपये दंडाची सश्रम कारावासाची शिक्षा दिनांक १९/०१/२०२३ रोजी सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे की..
झरी तालुक्यातील पोलीस स्टेशन मुकुटबन अंतर्गत फिर्यादी ही राहते.दि.३०.११.२०१९ रोजी फिर्यादी ही तीचे सासुसोबत शेतात कापुस वेचत असताना सासु ओंजळीतील कापुस खाली करण्यासाठी गेली असताना मागुन कोणीतरी अज्ञात ईसमाने शेतात येवून फिर्यादीचे तोंडात व डोळ्यात माती टाकुन ओरडशील तर याच ठिकाणी मारुन टाकतो अशी धमकी देत कानातील सोन्याचे झुमर सोन्याची पोत तसेच एक मोबाईल असा एकुण ९८०००/- रुपयेचा मुद्देमाल हिसकावून पळुन गेला.

वरुन फिर्यादी ही पतीसह पोलीस स्टेशन मुकुटबन ला जावुन घटनेचा रिपोर्ट दिला वरुन पोलीसांनी आरोपी विरूद्ध भादवीचे कलम ३९२,५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला व सदर गुन्हाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांनी करून प्रकरणात आरोपीस अटक करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी, तपास अधिकारी यांचे सह अकरा साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले.

यात साक्षीदार श्रीकांत जिंदमवार पोलीस उपनिरीक्षक स्था.गु.शा.यवतमाळ, गोल्हर नायब तहसीलदार झरी,रमेश गुडा मुथुट फायनान्स अदिलाबाद यांची साक्ष महत्त्वाची ठरली तसेच ईतर साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील पी डी कपुर व ठाणेदार अजीत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी जमादार मारोती टोंगे व नापोका संतोष मडावी यांनी काम पाहीले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर