ब्रेकिंग न्यूज
बाबापुरच्या गणरायाच्या चरणी लाखोंची गर्दी! Dagdusheth Halwai Ganpati | दगडूशेठ बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला पुणेकरांची गर्दी! | Ganesh Chaturthi मोबाइलवरून ओळख, तिने भेटण्यास नकार दिला, रात्री मागच्या दाराने घरात शिरला अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्… गणरायाच्या आगमनाची चाहूल! सिंदी येथे तान्हा पोळ्याचा उत्साह; चिमुकल्यांच्या सहभागाला बक्षिसांची दाद Crime : लग्न झालेले पण ‘ती’ आवडायची, बायकोने रंगेहाथ पकडताच भयानक घडलं, गर्लफ्रेंडसह नवऱ्याने शांत डोक्याने… चिकन, मटणपेक्षा पॉवरफुल अशी भाजी, शेतकऱ्यांनी केली शेती अन् 4 महिन्यात कमावले साडेचार लाख! Thane ATS News | Namira Khanने बनावट पासपोर्टमध्ये दिलेल्या पत्त्यावर नेमकं कोण राहतंय? | Tariq Khan Vaibhav Sooryavanshi : बुमराहने थोडीही दयामाया दाखवली नाही! 5 बॉल यॉर्करवर यॉर्कर अन् वैभव पायाचा अंगठा वाच… Nagpur : शेअर मार्केटमध्ये झाला लॉस, बँक लुटून केला खर्च ‘कव्हर’, B.SC ग्रॅज्युएट तरुण चोर बनला कसा? VIDEO
SP News Maregaon

मोबाइलवरून ओळख, तिने भेटण्यास नकार दिला, रात्री मागच्या दाराने घरात शिरला अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर : आधीपासूनची ओळख, मोबाइलवरून होणारे बोलणे आणि त्यानंतर भेटण्याचा आग्रह… मात्र, महिलेने भेटण्यास नकार दिल्यानंतर तरुणाने रात्री तिच्या घरात प्रवेश केल्याचा प्रकार रांजणगाव शेणपुंजी येथे समोर आला आहे. घरात शिरल्यानंतर बेडरूमचा दरवाजा बंद करून पती आणि सासऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीवरून सचिन अनिल राठोड (22) याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन राठोड हा काही वर्षांपूर्वी फिर्यादी महिलेच्या घराच्या परिसरात राहत होता. त्यामुळे दोघांची पूर्वीपासून ओळख होती. त्यांच्यात मोबाइलवरून बोलणे तसेच संदेशांची देवाणघेवाण होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही बाब महिलेच्या सासऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीला परिसरातून जाण्यास सांगितले होते.

दरम्यान, 10 सप्टेंबर रोजी आरोपीने महिलेला फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, तिने भेटण्यास नकार दिला. त्याच रात्री सुमारे 11 वाजता महिलेच्या घराच्या मागील बाजूच्या दरवाजावर आवाज झाला. महिलेने दरवाजा उघडला असता आरोपी घरात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर आरोपीने बेडरूमचा दरवाजा बंद केला. महिलेने आरडाओरड केल्यास तिच्या पतीसह सासऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीच्या बळावर आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर महिलेने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सचिन अनिल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर