ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

कोसारा येथे १६ वे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह उत्साहात

6 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील श्री हनुमान मंदिर, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर व श्री संत नानाजी महाराज मंदिराच्या भव्य पटांगणात मिती माघ शुद्ध ७, रविवार दि. २५ जानेवारी २०२६ ते मिती माघ पौर्णिमा, रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १६ वे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे.

या पवित्र सोहळ्याचे भागवताचार्य ह.भ.प. श्री प्रविणजी महाराज काटकर (श्रीक्षेत्र मालखोडी देवस्थान, गोजी, ता. जि. वर्धा) असणार आहेत. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सकाळी कलशस्थापना व हनुमंतरायाचा अभिषेक ह.भ.प. श्री अनिलजी पुरी महाराज यांच्या हस्ते होणार असून सायंकाळी भागवत कार्यक्रमास प्रारंभ होईल. दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी व सायंकाळी श्रीमद् भागवत प्रवचन तसेच सायंकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे.

भागवत कथेत प्रत्यक्ष व्यास दर्शन, नारद देवर्षी, परीक्षिती, सनक-सनकादिक, भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यप, वामन अवतार, बळी अवतार, तसेच राम-गोपाल लीला, गोवर्धन लीला, कंसवध आदी प्रसंगांची भव्य झाकी सादर होणार आहे. कार्यक्रमात विविध नामवंत हरिभक्त परायण महाराज, गायक, वादक व भजन मंडळींचा सहभाग लाभणार आहे.

रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत श्रीमद् भागवत ग्रंथ व श्री संत नानाजी महाराज यांच्या पालखीचा दिंडी सोहळा संपूर्ण गावातून निघणार आहे. त्यानंतर ह.भ.प. गौरव महाराज ठाकरे (वर्धा) यांचे गोपालकाळ्याचे कीर्तन होणार आहे.
सप्ताह काळात विविध दिवसांसाठी सकाळचा नाश्ता तसेच दुपार व रात्रीच्या भोजन पंगतीसाठी गावातील अन्नदात्यांनी सेवा स्वीकारली असून समारोपाच्या दिवशी महाप्रसाद होणार आहे.

या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी व ग्रामपंचायत कोसारा (सोईट) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर