ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शिक्षकाने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात.

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वेतनातून 20 हजार रु. कपातीचे दिले गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मागील 20 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळल्याने वर्धा नदीला महापूर येवुन हजारो हेक्टर शेती पीके खरडून गेली, तर अनेकांच्या घराची गावात पाणी शिरुन पडझड झाल्याने अस्मानी संकटाचा सामना करण्यास हतबल झालेल्या शेतकरी शेतमजुरांना, सामाजिक भान जपत एका संवेदनशील प्राथमिक शिक्षकाने मदतीचा हात पुढे करत त्यांच्या वेतनातून 20 हजार रुपये पुरग्रस्तांना देण्यात यावे असे पत्र गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.

तालुक्यासह राज्यात सध्या पावसाने हाहाकार माजवला असुन मागील 20 दिवसांपासून धो धो पाऊस कोसळत आहे.त्यामुळे तालुक्यातील जिवन दायीनी ठरणारी वर्धा, निरगुडा नदी तथा नाल्यांना महापूर येवुन  शेतकरी अस्मानी, व शासनाकडुन मदत जाहीर झाली नसल्याने व फक्त आश्वासीतच केल्याने सुलतानी संकटात सापडला आहे.

शासनाकडुन ठोस मदत मिळेल या आशेवर असणाऱ्या बळीराजाची आर्थिक घुसमट होत असतानांच तालुक्यातील जळका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मानवतावादी संवेदनशील शिक्षक “सुभाष मोतीराम केराम” यांनी त्यांच्या माहे जुलैच्या वेतनामधुन, शिक्षण विभागाला पत्र देऊन 20 हजार रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात यावे अशी पत्राद्वारे विनंती केली आहे.


विद्यार्थ्यी घडवण्याचे सत्कार्य करत असतानाच पुरग्रस्तांना मदतीचा हात देत समाजासमोर आदर्श  निर्माण करणाऱ्या या शिक्षकांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर