ब्रेकिंग न्यूज
⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा… ✦ ⚡ नागपूर हळहळलं! भरधाव ट्रेलरने कुटुंबाला चिरडलं, पती-पत्नीसह 4 वर्षीय चिमुकल्याचा जागीच अंत ✦ ⚡ महिलांसाठी महत्त्वाची बातमी, लगेच अर्ज करा आणि शेतकरी प्रमाणपत्र घ्या, सरकारी योजनांचा थेट लाभ ✦ ⚡ गाडी पार्किंगवरून वाद, मध्यस्थी करणाऱ्यालाच संपवलं, मामा-भाच्यासह सहा जणांवर गुन्हा, सोलापुरात खळबळ ✦ ⚡ औंढा नागनाथ मंदिर एक महिना बंद राहणार, भाविकांना 5 ऑक्टोबरपासून दर्शन नाही, कारण… ✦ ⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच…
SP News Maregaon

ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव कान्हाळगाव युगांतर प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा, कान्हाळगाव, ता. मारेगाव, जि. यवतमाळ येथील ज्येष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर झित्रुजी ढोके हे आपल्या प्रदीर्घ व यशस्वी सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाळेच्या वतीने विशेष सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.

ज्ञानेश्वर ढोके यांनी सन १९९४ पासून शिक्षण क्षेत्रात अविरत ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. आपल्या सेवाकाळात त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवून त्यांचे भविष्य घडविण्यात मोलाचे योगदान दिले. मनमिळाऊ स्वभाव, प्रभावी अध्यापन पद्धती व सहकार्याची भावना यामुळे ते विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये लोकप्रिय होते.

निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक मुख्याध्यापक संजयराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक मुख्याध्यापक प्रशांतजी पस्वाके, माजी मुख्याध्यापक विजयराव काटवले, प्रकाशराव बाहे, सुरेशराव काकडे, सेवानिवृत्त शिक्षक दिनेश वैद्य तसेच सत्कारमूर्ती ज्ञानेश्वर ढोके व नंदाताई ढोके उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व ड्रेस देऊन ज्ञानेश्वर ढोके यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तसेच नंदाताई ढोके यांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय विजयराव काटवले, प्रकाशराव बाहे, सुरेशराव काकडे, गजानन उपरे, विनोद नित, एकनाथ सारखे, दिनेश वैश्य व प्रदीप खामनकर यांनी वैयक्तिकरित्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी उपस्थितांनी ज्ञानेश्वर ढोके यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा गौरव करून त्यांच्या पुढील सुखी, समाधानी व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उपरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप खामनकर यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर