ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिवसेना शिंदे पक्षातून शहरातील दोघांना केले मुक्त

233 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुका प्रतिनिधी प्रमोद रामाजी मेश्राम

मारेगाव : शिवसेना पक्षाच्या ध्येय-धोरणांच्या विरोधात कार्य केल्याच्या कारणावरून मारेगाव शहरातील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना पक्षातून मुक्त करण्यात आली आहे. युवा सेना पदावर कार्यरत असलेले मारेगाव शहर संघटक योगेश विठ्ठल नागोसे तसेच सोशल मीडिया शहराध्यक्ष तन्मय गोपाल सरोदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पक्षातून निष्कसित करण्यात आले आहे.

ही कारवाई मारेगाव तालुका अध्यक्षांनी शुक्रवार, दि. 12 डिसेंबर 2025 रोजी केली. तसेच संबंधित दोघांनाही यापुढे शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह किंवा कोणत्याही प्रकारचा पक्षीय वापर करण्यास मनाई करण्यात आली असून पक्षाकडून त्यांना तंबी देण्यात आली आहे.

दरम्यान, यात रिक्त झालेल्या पदांचा तात्पुरता प्रभार मारेगाव शहर संघटक म्हणून शुभम ठावरी तर सोशल मीडिया शहराध्यक्ष म्हणून असीम सलीम शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. लवकरच या दोन्ही पदांवर वरिष्ठ पातळीवरून अधिकृत नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याची माहिती मारेगाव तालुका प्रमुख विशाल मनोहर किन्हेकार यांनी दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर